Ad will apear here
Next
कथक-कीर्तनाचा झाला संगम...
कीर्तन कथक कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे

पुणे :
नृत्यकलेचा उगम कीर्तनकलेच्या माध्यमातून कशा प्रकारे झाला, याचा प्रत्यक्ष अनुभव पुणेकर रसिकांनी नुकताच कीर्तन-कथक कार्यक्रमातून घेतला. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांनी या दोन्ही कला रंगमंचावर एकत्रितपणे सादर करून रसिकांना अनोख्या कलाविष्काराची विलक्षण अनुभूती दिली.
 
पारंपरिक कलाविष्कार क्षेत्रातील दोन दिग्गजांचा प्रवास रसिकांसमोर उलगडण्याकरिता ‘सूत्रधार’तर्फे ‘कीर्तन-कथक’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. या वेळी शारंगधर साठे, सुचेता भिडे-चापेकर, गिरिजा बापट, रवींद्र दुर्वे, प्रमोद जोशी आदी मान्यवरांसह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
कार्यक्रमाची सुरुवात दुर्गास्तवनाने झाली. या वेळी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी देवीची महती सांगितली. यानंतर ‘जय दुर्गे...’ या दुर्गा स्तवनावर ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे यांनी कथक नृत्याच्या सादरीकरणातून देवीला वंदन केले. यानंतर, महिषासुराचा नाश करण्यासाठी देवीने महिषासुरमर्दिनीचा अवतार कसा धारण केला, याचं निरूपण आफळेबुवांनी कीर्तनामधून केले आणि त्या आशयावर आधारित नृत्यसादरीकरणाच्या माध्यमातून रसिकांनी प्रत्यक्ष दुर्गा अवतरल्याचा अनुभव घेतला. 

कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आणि पं. मनीषा साठे यांनी कथकच्या माध्यमातून संत कान्होपात्रा यांची कथा रसिकांसमोर मांडली. आफळेबुवांनी कीर्तनातून मांडलेला भावगर्भ आशय पं. साठे यांनी त्याला समर्पक अशा नेटक्या नृत्यसादरीकरणातून रसिकांसमोर मांडला.

पं. मनीषा साठे यांना चारुदत्त फडके, वल्लरी आपटे, मृण्मयी फाटक, लीलाधर चक्रदेव, सुनील अवचट यांनी, तर चारुदत्त आफळे यांना मनोज भांडवलकर, मिलिंद तायवडे ,वज्रांग आफळे, रेशीम खेडकर यांनी साथसंगत केली. 

(या कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZQABM
Similar Posts
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना कीर्तनभूषण पुरस्कार पुणे : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा ४६ वा वर्धापनदिन पुणे शाखेत मंगळवारी, दि. आठ जानेवारी २०१९ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना ज्येष्ठ गायक, लेखक आनंद माडगुळकर यांच्या हस्ते कीर्तनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
चारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर पुणे : संगीत, नाट्य, कला क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कलाकाराला पुणे महानगरपालिकेतर्फे दर वर्षी बालगंधर्व पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार प्रख्यात कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना जाहीर झाला आहे.
कथक नृत्यामधून अवतरणार ‘नृत्य धारा’ पुणे : परंपरा आणि वारसा यामधून आपली कथक नृत्यपरंपरा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे. या समृद्ध कथक नृत्यकलेचा अनुभव देण्याच्या उद्देशाने येत्या शनिवारी दि. २४ नोव्हेंबर व रविवारी, दि. २५ नोव्हेंबर, रोजी प्रसिद्ध कथक नृत्यांगना पंडिता मनीषा साठे यांच्या संकल्पनेतून ‘नृत्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
‘मधुरिता’च्या तपपूर्ती महोत्सवाचा समारोप पुणे : मधुरिता सारंग स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या तीन दिवस चाललेल्या तपपूर्ती महोत्सवाचा समारोप शुक्रवारी, आठ फेब्रुवारी २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे, ‘शब्द परिवारा’चे प्रमुख संजय सिंगलवार, स्वागताध्यक्ष अॅड

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language