Ad will apear here
Next
अवयदानामुळे पाच जणांना नवजीवन
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात यशस्वी अवयव प्रत्यारोपण
पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील एका मेंदू मृत महिलेचे अवयवदान करण्यात आल्याने पाच रुग्णांना जीवदान मिळाले. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातच ही अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
 
अपघातात जखमी झालेल्या ६० वर्षीय महिलेला मेंदू मृत घोषित करण्यात आले होते. अवयवदान केल्यास अन्य पाच जणांचे प्राण वाचू शकतात याची माहिती प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयकांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना दिली. त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. मृत महिलेच्या कुटुंबीयांनीही आपले दुःख बाजूला ठेवून, अवयवदानाचा निर्णय घेतला. मृत महिलेचे यकृत, दोन मूत्रपिंडे आणि दोन नेत्रपटल हे अवयव दान करण्यात आले. 

‘आई गेल्याचे दुःख आहेच; परंतु तिचे अवयव दान करून इतर पाच व्यक्तींमध्ये आईला जिवंत पाहू शकू’, अशी भावना अवयवदात्या महिलेच्या मुलाने व्यक्त केली.

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील ६१ वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपण, तर ४७ वर्षीय पुरुष व ३३ वर्षीय स्त्री अशा दोन रूग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय; तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या रुग्णांना जीवनदान मिळाले. 
 
‘अवयव प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत आहे, मात्र अजूनही अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे,’ असे मत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केले. अवयवदानाचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी अवयवदात्याच्या कुटुंबीयांचे आभार मानले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनीही अवयवदात्याच्या कुटुंबीयांचे आभार मानले. ‘समाजातील लोकांनी अवयवदानाविषयी विचार करण्याची गरज आहे. आपण मरणानंतरही इतरांना जीवनदान देऊ शकतो. अवयवदानासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे. या वर्षभरात आठ रुग्णांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे २० रुग्णांना जीवदान मिळाले असून, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ९२ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत, ’ असे त्यांनी सांगितले.
 
डॉ. तुषार दिघे, डॉ. बिपीन विभुते, डॉ. दिपाली काटे, डॉ. आशिष चुग, डॉ. रेणू मगदूम, डॉ. स्मिता जोशी यांनी हे अवयव प्रत्यारोपण यशस्वी केले. डॉ. अमरजित सिंग, डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. एच. एच. चव्हाण यांचेही या प्रक्रियेत योगदान लाभले.  

(ही बातमी इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZUQCF
Similar Posts
मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान पुणे : नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला कोल्हापूरमधील १८ वर्षीय तरुण दुचाकी अपघातामुळे मेंदूमृत झाला. त्याचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले.
एकाच यकृताने दिले दोघांना जीवदान; पुण्यात ‘स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट’ यशस्वी पुणे : स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट अर्थात एकाच ब्रेनडेड रुग्णाच्या यकृताचे दोन भाग करून त्यांचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये प्रत्यारोपण करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या या स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांटमुळे अनेकांना आशेचा किरण मिळाला आहे.
पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला राष्ट्रीय पातळीवरील कायाकल्प पुरस्कार नवी दिल्ली : राष्ट्रीय आरोग्य मिशन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियान सर्वेक्षणात पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्र खासगी रुग्णालयांमध्ये सर्वोत्तम ठरले आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘कायाकल्प २०१९’ हा पुरस्कार देऊन हॉस्पिटलचा सन्मान करण्यात आला
नवजीवन देण्यासाठी धडपडणारी ‘रीबर्थ फाउंडेशन’ पुण्यातील रीबर्थ फाउंडेशन ही संस्था अवयवदानासंदर्भात जनजागृतीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. या संस्थेने अवयवदानासंदर्भात माहिती देणारी टोल फ्री हेल्पलाइनही सुरू केली आहे. तसेच जनजागृतीसाठी शॉर्टफिल्म स्पर्धेसह विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवत असते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज माहिती घेऊ या रीबर्थ फाउंडेशनच्या कार्याची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language