Ad will apear here
Next
समाजासाठी पैसे नव्हे, वेळ गोळा करणाऱ्या विनिलची गोष्ट
आपल्या देशात गरजूंची कमतरता नाही. कोणाला अन्न मिळत नाही, तर कोणी शिक्षणाच्या सुविधांपासून वंचित असतं. काही गावांमध्ये रोगराई पसरलेली असते. आपल्याला अगदी किरकोळ वाटणारे प्रश्नही खूप महत्त्वाचे असू शकतात. डॉ. अदुदोदला विनिल रेड्डी या तरुणाने गरजूंच्या गरजा ओळखल्या. त्याच्या अंगी लहानपणापासूनच परोपकारी वृत्ती भिनलेली होती. आज हैदराबादमध्ये ‘अभिस्ती वेल्फेअर सोसायटी’ ही त्याची सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो लाखो लोकांना मदत करतो आहे.

इतरांना मदतीचा हात देताना बरेच जण दहा वेळा विचार करतात; मात्र परोपकारी वृत्ती असेल तर सगळं काही जुळून येऊ शकतं. यासाठी विनिल रेड्डीचं उदाहरण देता येईल. विनिल हा २५ वर्षांचा तरुण. पेशाने इंजिनिअर आहे. त्याच्याकडे उत्तम नोकरी आहे; पण ‘फक्त मी आणि माझं’ एवढाच विचार तो करत नाही. त्याला इतरांना मदत करायला खूप आवडतं. म्हणूनच १४ वर्षांचा असताना विनिल कॅन्सरग्रस्त मुलाच्या मदतीसाठी धावत सुटला होता. विनिल आणि त्याचे काही सहकारी या मुलाशी गप्पा मारायचे. खेळायचे. या मुलाचा मृत्यू होईपर्यंत हे सगळं सुरूच राहिलं. यात विनिलला भाऊ सुनीलची साथ लाभली. हे या दोघांचं परोपकाराच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होतं. विनिलला पुढे मानवतेचा दूत व्हायचं होतं. 

विनिलने ‘अभिस्ती वेल्फेअर सोसायटी’ ही झीरो फंड सेवाभावी संस्था सुरू केली. ‘पैसे नको, समाजासाठी फक्त तुमचा थोडा वेळ द्या,’ अशी त्याच्या संस्थेची टॅगलाइन आहे. आज या संस्थेचे ३४ हजार कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विनित लोकांना मदत करतो. या संस्थेच्या देशभरात ५६ शाखा आहेत. अन्नदान, शेतकऱ्यांना मदत, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं दान, गाव दत्तक घेणं अशी बरीच कामं या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत.

विनिलने २०१५मध्ये ही संस्था सुरू केली. दहावीत असताना विनिलने शाळेत स्माईलीज कॅन्सर फाउंडेशन हा उपक्रम राबवला होता. या अंतर्गत वर्गातल्या प्रत्येक मुलाला दिवसाला एक रुपया दान करायचा होता. म्हणजे महिन्याला ३० रुपये दान करावे लागणार होते. या पैशातून विनिल कपडे, धान्य, खाण्याचं साहित्य, औषधं, किराणा सामान विकत घेऊन कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना देत असे. पदवी मिळवल्यानंतर विनिलने समाजसेवेचा आवाका वाढवायचं ठरवलं आणि अभिस्ती या संस्थेची स्थापना झाली. गेल्या चार वर्षांत अभिस्तीच्या माध्यमातून असंख्य उपक्रम राबवण्यात आले आहेत आणि तेसुद्धा बाहेरची मदत न घेता.

स्वत:ला आलेल्या अनुभवांनंतर विनिलने लोकांना मदत करायचं ठरवलं. मध्यंतरी मध्यरात्री बसने प्रवास करत असताना विनिलला खूप भूक लागली; पण एवढ्या रात्री त्याला काहीच खायला मिळालं नाही. यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची व्यथा त्याच्या लक्षात आली. अनेक गरीब लोकांना कामानिमित्ताने एवढा लांबचा प्रवास करावा लागतो. या लोकांना रात्री खायला मिळावं म्हणून विनिल आणि संस्थेचे कार्यकर्ते हॉटेलच्या मालकांना भेटले. त्या मालकांनी हॉटेलमधलं राहिलेलं अन्न वाटण्याची परवानगी दिली. काही काळानंतर लोकांना मदत म्हणून ही हॉटेल्स स्वत:हून अन्नदान करू लागली. या संस्थेने एक गावही दत्तक घेतलं आहे. तरुणांना करिअरबाबत मार्गदर्शन केलं आहे. महिलांना रोजगार दिले आहेत. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून दिलं आहे. विनिल आपली नोकरी सांभाळून हे सगळं करतो. अशा या विनिलच्या सेवाभावी वृत्तीला सलाम करायलाच हवा.

अधिक माहितीसाठी : https://abhistiwelfaresociety.in/
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZXNCI
Similar Posts
‘पानिपत’मध्ये घुमला कराडच्या तुतारीचा आवाज कराड : मराठी वीरांच्या अफाट शौर्याची कहाणी सांगणारा पानिपत चित्रपट पाहताना त्यात वाजणारी तुतारी अंगावर रोमांच उभे करते. ही तुतारी कोणी वाजवली आहे माहित आहे का? ही तुतारी वाजवली आहे कराडमधल्या तरुणांनी. कालौघात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली ही मराठी मातीतली लोककला इथल्या काही युवकांनी जपली आहे. त्यामुळे
क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्जाविषयी.. क्रेडिट कार्डने वारेमाप खर्च केल्यानंतर या पैशांच्या परतफेडीचा प्रश्न उभा राहतो. ही रक्कम वेळेत भरली नाही, तर बराच दंड आकारला जातो. शिवाय क्रेडिट स्कोअर ही खराब होतो. अशा परिस्थितीत मदतीला येते ते क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज....
७० लाखांचे पॅकेज नाकारून इलेक्ट्रिक वाहनांची कंपनी सुरू करणारा जिगरबाज अली उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांना गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असते. लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर सहसा कोणी नाकारत नाही; पण दिल्लीच्या मोहम्मद आमिर अली या जिगरबाज तरुणाने थोड्याथोडक्या नाही, तर ७० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी नाकारली आणि भारतात राहून देशासाठी काही तरी करण्याच्या इच्छेने इलेक्ट्रिक वाहने बनवणारी स्वतःची कंपनी सुरू केली
धारणा बदलताहेत.. यंदाच्या एक, दोन नाही तर पाच प्रमुख सौंदर्य स्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय सौंदर्यवतींनी पटकावलं. फक्त गौर वर्ण म्हणजे सौंदर्य नाही; सौंदर्याची व्याख्या खूप वेगळ्या पद्धतीने करता येते, हे या तरुणींनी दाखवून दिलं. त्यामुळे समाजातील जुनाट धारणा आजची स्त्री बदलून टाकेल, असा विश्वास निर्माण होत आहे....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language