Ad will apear here
Next
देवमाळ
देव आहे की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवमाळ’मधून ब्रह्मसूत्रे-वेदांतसूत्रे याचे विश्लेषण करताना देव या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे.

ब्रह्मसूत्रे-वेदांतसूत्रे शारीरिकमीमांसा असेही म्हणतात. कारण यात स्वरूप साकारले आहे, असे लेखकाने म्हटले आहे. याच्या पहिल्या प्रकरणात ब्रह्म आणि त्याच्याशी तादात्म्य पावणे, दुसऱ्या अध्यायात वेदांत व इतर शास्त्रे यात विरोध नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. तिसऱ्या प्रकरणात ब्रह्मापाशी जाणे, त्यात मिसळणे याबद्दल माहिती दिली आहे, तर चौथ्या प्रकरणात ब्रह्मप्राप्तीमुळे काय होते हे सांगितले आहे.

ब्रह्म, देव हा या पुस्तकाचा मुख्य विषय असल्याने ब्रह्माचे स्वरूप यात स्पष्ट केले आहे. पूर्ण ब्रह्म आणि व्यक्तिगत, माणसांतील ब्रह्म यांची संगती लावताना ब्रह्माची एकाग्रता कशी साधावी, ध्यानधारणा कशी करावी हे सुचविले आहे. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, वेद-उपनिषदांची माहितीही दिली आहे. सोप्या भाषेतील या माहितीतून ब्रह्मसूत्रे व त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांचे ज्ञान मिळते.

पुस्तक : देवमाळ
लेखक : प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी
प्रकाशक : दीर्घायू इंटरनॅशनल
पाने : १८७
किंमत : ४०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZKVBY
Similar Posts
ज्ञानेश्वरी वाचताना श्रीकृष्णाने सांगितलेली गीता ही संस्कृतमधून होती. ती सामान्यांना कळावी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ती मराठीत आणली; पण गीतेचे फक्त भाषांतर नाही, तर कृष्णाला अर्जुनामार्फत सर्वांना काय सांगायचे आहे ते ‘ज्ञानेश्वरी’तून त्यांनी ओवी स्वरूपात सांगितले आहे. या ओव्या रचताना अनेक उदाहरणे, दृष्टांत, उपमा, अलंकार यांचा वापर केला आहे
होण्या बरे- गोळ्या चूर्णे निरोगी शरीरसंपदा ही देणगी असली, तरी टिकविणे आपल्या हातात असते. यासाठी व्यायाम व आहाराला महत्त्व आहे; पण तरी कधीकधी किरकोळ दुखणे होते. कधी गंभीर आजार जडावतात. त्यामुळे औषधोपचार करणे ओघाने येतेच. यासाठी विविध वनस्पतींचा वापर केलेली आयुर्वेदिक औषधे व त्यांचे गुणधर्म, ती बनविण्याची पद्धत, औषधे वापरण्याचे प्रमाण याची माहिती प्रा
महापुराण उपदेश हिंदू धर्मात १८ मोठ्या पुराणापैकी एक आहे गरुड पुराण. विष्णू हा याच्या केंद्रस्थानी आहे. यात १९ हजार श्लोक आहेत, असे परंपरेने मानले जाते; पण आज जी हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यात आठ हजार श्लोक आहेत. या पुराणाची, तसेच मरण, भगवद्गीता आणि पुराणांतील लिखाण याबद्दल प्रा. डॉ. पांडुरंग हरी कुलकर्णी यांनी ‘महापुराण उपदेश’मधून सोप्या भाषेत माहिती दिली आहे
देवबोध ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये उपनिषदांचा समावेश होतो. हिंदू तत्त्वज्ञानाचा, विचारधारेचा पाया म्हणजे उपनिषदे. एकूण २०० उपनिषदांची नोंद असून, सर्वांत जुनी असलेली डझनभर उपनिषदे असून, ती मुख्य मानली जातात, अशी माहिती देत प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवबोध’मधून मुख्य उपनिषदांचे सोप्या मराठीत रूपांतर केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language