Ad will apear here
Next
गणपती देखाव्यातून साकारली ‘महाराष्ट्राची लोकधारा’
सांगवीतील तरुणाचा प्रेरणादायी उपक्रम

पुणे : आधुनिकतेच्या काळात आपल्या राज्याची पारंपरिक संस्कृती आजच्या तरुणांपर्यंत पोहोचणे तसे अवघडच. याची जाणीव ठेवून सांगवी भागात राहणाऱ्या जवळेकर कुटुंबियांनी समाजप्रबोधनासाठी घरगुती गणपतीच्या देखाव्यातून महाराष्ट्राची लोकधारा साकारली आहे.

लोकनृत्य, लावणी, वासुदेव, जागरण-गोंधळ, कोळी समाज, धनगर समाज, शेतकरी, शिवशाहीर अशी चित्रे या देखाव्याच्या माध्यमातून जिवंत करण्यात आली आहेत. जवळेकर कुटुंबातील अभिषेक जवळेकर या तरुणाने तब्बल दीड महिना मेहनत करून हा देखावा उभा केला आहे. यासाठी त्याने कापडाच्या २६ बाहुल्या बनवल्या आहेत. त्यापैकी २१ पेक्षा अधिक बाहुल्या या हलत्या देखाव्याचे दर्शन घडवतात.  

महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आजच्या मुलांना समजावी या उद्देशाने आपल्या मुलाने हा विषय मांडावा असा अभिषेकच्या आईचा आग्रह होता. गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक विषय घेऊन घरगुती बाप्पापुढे देखावा सादर करण्याची जवळेकर कुटुंबाची परंपरा राहिली आहे. यांत आता महाराष्ट्राची संस्कृती साकारून अभिषेकने आणखी एक पाऊल पूढे टाकले आहे.  

पुढच्या पिढीला काही वर्षांनी या पारंपरिक लोकधारा केवळ पुस्तकात पाहायला मिळतील, अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे जवळेकर कुटुंबाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक लोकधारा रुजवण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. या देखाव्याची चर्चा परिसरात सर्वत्र होत आहे.

(देखाव्याचा आणि आभिषेकची प्रतिक्रिया असलेला व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZMWBS
Similar Posts
देश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या दर्शनाची संधी पुणे : सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा केवळ आपल्या देशातच नव्हे, तर अन्य वेगवेगळ्या देशांतही वेगवेगळ्या रूपांत पाहायला मिळतो. देशविदेशातील त्याची नाना रूपे बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरलेल्या प्रदर्शनात पुणेकरांना सध्या पाहायला मिळत आहेत. भारतीय संस्कृतीचे अभ्यासक देवदत्त अनगळ यांच्या संग्रहात असलेल्या
वाहतुकीच्या खेळखंडोबातून मार्ग काढणारा बाप्पा.. गणेशोत्सवात अनेकजण नागरिकांचे मंनोरंजन करत असतानाच आपल्या देखाव्यातून काही सामाजिक संदेश देता येईल का, याचाही पूरेपूर विचार करून त्या पद्धतीची आरास करत असतात. पुण्यातील पर्वती परिसरात राहणारे रत्नाकर जोशी यांनी आपल्या घरात पुणे शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा यावर आधारित प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे.
पाणीपुरीच्या १० हजार पुऱ्यांपासून १० फुटी गणेशमूर्ती पुणे : गणेशोत्सवात गणपतीबाप्पाची वेगवेगळी रूपे साकारली जातात. आपली कल्पकता लढवून विविध ठिकाणी विविध साहित्यापासून गणेशमूर्ती बनविल्या जातात. अशा वेगवेगळ्या रूपांतील गणपतीबाप्पा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुण्यातील असेच एक आगळेवेगळे गणेशरूप पाहायला लोकांची गर्दी होत आहे. ही मूर्ती चक्क पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून बनविलेली आहे
ढोल बजने लगा... गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी पुण्यात ढोलपथकांची तयारी सुरू झाली असून, ठिकठिकाणी पथकांच्या सरावाचा आवाज घुमू लागला आहे. त्या आवाजाने भारलेल्या वातावरणामुळे गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेतत. ढोलपथकांच्या या तयारीचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेला हा आढावा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language