Ad will apear here
Next
स्मार्ट आशिया प्रदर्शनाला मुंबईत सुरुवात
तैवान आणि भारताचा संयुक्त उपक्रम
स्मार्ट आशिया प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे प्रतिनिधी चुंग क्वान टीएन, एमिलिया शीह व अन्य मान्यवर

मुंबई : स्मार्ट सिटी उभारण्यासाठी आवश्यक यंत्रणा, तंत्रज्ञान, सेवा, उत्पादने यांचे ‘स्मार्ट आशिया 2019’ प्रदर्शन नुकतेच मुंबईत सुरू झाले. तैवान एक्सर्टनल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिल आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतातील तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे प्रतिनिधी चुंग क्वान टीएन यांच्या हस्ते झाले.
 
बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे भरलेल्या या प्रदर्शनात स्मार्ट वाहतूक, स्मार्ट ऊर्जा, स्मार्ट जल व्यवस्थापन इत्यादी सुविधा उभारण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, उपकरणे पहायला मिळत आहेत.  

स्मार्ट आशिया प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटरचे प्रतिनिधी चुंग क्वान टीएन
चुंग क्वान टीएन म्हणाले, ‘दोन्ही देशांमधील व्यापार  सहा पटींनी वाढून ७.५ अब्जांवर पोहोचला आहे. भारत आणि तैवान दरम्यानचे व्यापारी संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत आणि तैवान परस्पर सहकार्याच्या आधारे भारतात स्मार्ट सिटी निर्माण करू शकतात.’

तैवान एक्सर्टनल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिलच्या एक्झिबिशन डिपार्टमेंटच्या कार्यकारी संचालक एमिलिया शीह म्हणाल्या, ‘ स्मार्ट सिटी उभारणे हा एक जागतिक प्रवाह आहे. जगातील निम्म्याहून अधिक जनता शहरांमध्ये राहते आणि २०५० पर्यंत दोन तृतीयांशहून अधिक लोक शहरांमध्ये येणार आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी उभारण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. भारत आणि तैवान यांच्यात दीर्घ काळापासून उत्पादक भागीदारी असल्यामुळे स्मार्ट सिटीच्या उभारणीत दोन्ही देश उत्तम सहकार्य करू शकतील.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZUNCF
Similar Posts
मुंबईत प्रथमच स्मार्ट आशिया प्रदर्शनाचे आयोजन मुंबई : दी तैवान एक्सटर्नल ट्रेड डेव्हलपमेंट काउन्सिल आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने मुंबईत प्रथमच ‘स्मार्ट आशिया-एक्स्पो अँड समीट २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे हे प्रदर्शन भरणार आहे.
रेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार मुंबई : भारतातील सर्वात मोठी वॉटर हीटिंग सोल्यूशन्स पुरवठादार रेकोल्डने ‘सुपरब्रँड्स’ हा पुरस्कार जिंकत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. ऑनलाइन ग्राहक मतदान प्रक्रियेनंतर सुपरब्रँड म्हणून निवडला गेलेला रेकोल्ड हा वॉटर हीटिंग विभागातला एकमेव ब्रँड आहे. हा पुरस्कार आपल्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या ब्रँड्सनाच दिला जातो
आयसीआयसीआय बँकेने दिले वीस लाखांहून अधिक फास्टॅग मुंबई : आयसीआयसीआय बँकेने आतापर्यंत वीस लाखांहून अधिक फास्टॅग जारी केले असून, देशातील कोणत्याही वित्तीय संस्थेने नोंदवलेली ही सर्वाधिक संख्या आहे. बँकेने येत्या सहा महिन्यांत ही संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
‘एआयआयबी’ची भारतात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मुंबई : एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताला आतापर्यंत सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा अर्थपुरवठा केला आहे. बँकेने भारतातील गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language