Ad will apear here
Next
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि शर्मिला पटवर्धन लिखित कॅनव्हास ते वॉल या चित्रकार-शिल्पकार डॉ. पुष्पा द्रविड यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन

बौद्धिक, भावनिक आणि सर्जनशील असे व्यक्तिमत्वाचे तीन पैलू आहेत. हे तील पैलू जितके समृद्ध होतील तितका व्यक्तिमत्वाचा उत्तम विकास होतो. असे मत भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी काल दि. २५ नोव्हेंबर रोजी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट येथे पार पडलेल्या बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि शर्मिला पटवर्धन लिखित कॅनव्हास ते वॉल या चित्रकार-शिल्पकार डॉ. पुष्पा द्रविड यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन करताना आपल्या मनोगतात व्यक्त केले.


पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. सोबत चरित्र नायिका चित्रकार-शिल्पकार डॉ. पुष्पा द्रविड, लेखिका शर्मिला पटवर्धन, बुकगंगा पब्लिकेशन्सच्या सुप्रिया लिमये उपस्थित होत्या. या बरोबरच डॉ. पुष्पा द्रविड यांचे दोन्ही चिरंजीव राहुल द्रविड आणि विजय द्रविड यांची खास उपस्थिती होती.


डावीकडून विजय द्रविड, सुप्रिया लिमये, डॉ. पुष्पा द्रविड, डॉ. शंकर अभ्यंकर, शर्मिला पटवर्धन आणि राहुल द्रविड


एक आई मुलांना जे संस्कार करून वाढवते, तेच मी पण केले. मी वेगळे असे विशेष काही केले नाही. मी माझे कर्तव्यच केले. माझ्या मुलांनी त्याचे चीज केले आणि मला नाव दिले. अशा भावना डॉ. पुष्पा द्रविड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. पुस्तकाच्या लेखिका शर्मिला पटवर्धन यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका आणि पुस्तकाचा प्रवास व्यक्त केला. सुप्रिया लिमये यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.


बुकगंगा.कॉम वरून कॅनव्हास ते वॉलयाचे प्रिंट पुस्तक आणि ई-बुक विकत घेण्यासाठी खाली डीटेल्स दिलेले आहेत-


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZVLDQ
Similar Posts
बुकगंगा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित आणि पद्माकर पाठकजी लिखित ‘सुनहरे गीत’ या पुस्तकाचे प्रकाशन गाणी ऐकण्याच्या छंदाला अभ्यासाचे रूप देणे आणि त्यावर पुस्तक लिहिणे हे विशेष आहे...
लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेले आणि शुभदा विद्वंस यांनी भाषांतरित केलेले मराठी पुस्तक प्रकाशन सोहळा... लेखिका स्मिता यांचे मूळ इंग्रजी पुस्तक Face IT चे बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे यांच्यातर्फे मराठी भाषांतर प्रकाशित...
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language