Ad will apear here
Next
मुख्यमंत्र्यांची विविध मंडळांच्या गणपती दर्शनाला हजेरी
मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी, सहा सप्टेंबर रोजी पुण्यातील मानाच्या पाच, तसेच अन्य काही गणपती मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि सर्वांच्या सुखासमाधानासाठी प्रार्थना केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती केली. मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. 

दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेताना मुख्यमंत्री

त्यानंतर दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे व उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी दि विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेताना मुख्यमंत्री

यानंतर त्यांनी मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. या वेळी अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी त्यांचे स्वागत केले. मंडळाच्या आणि सिध्देश्वर ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यानंतर फडणवीस यांनी मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. या वेळी महापौर मुक्ता टिळक व दैनिक केसरीचे संपादक दिपक टिळक यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी मुख्यमंत्री सहायता निधीस जनता सहकारी बँकेकडून २१ लाख रुपयांचा धनादेश, तसेच उद्यम विकास बँक आणि चरणजीत सहाणी यांच्यातर्फे धनादेश देण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साने गुरुजी तरुण मंडळ येथील गणपतीचे दर्शन घेतले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर फडणवीस यांनी साने गुरुजी तरुण मंडळ येथील गणपतीचे दर्शन घेतले आणि मंडळामार्फत उभारण्यात आलेल्या देखाव्याचे उद्घाटन केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांचे स्वागत केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोथरुडमधील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळ यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन केले; तसेच गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZYCCE
Similar Posts
पुण्यात साने गुरुजी तरुण मंडळातर्फे राम मंदिराची ६० फूट उंच प्रतिकृती पुणे : पुण्यातील साने गुरुजीनगरमधील साने गुरुजी तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती १०० फूट लांब, ४० फूट रुंद आणि ६० फूट उंच आहे. दोन सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते मंडळाच्या गणपतीबाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली
संजीव कुलकर्णी यांनी साकारले ‘देह देवाचे मंदिर’ पुणे : ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर! जशी ऊसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर!’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न पुण्यातील संजीव कुलकर्णी यांनी केला आहे. घरातील गणपतीच्या सजावटीसाठी त्यांनी या अभंगातील संदेश देणारा देखावा उभारला आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा कोणार्कच्या सूर्यमंदिराची सजावट पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीदिनी सोमवारी, दोन सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प. पू. विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे
‘देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील’ पुणे : ‘राज्यातील आयआयटी, आयआयएममधील युवकांना एकत्रित करून कार्यान्वित केलेली ‘वॉर-रूम’, शासकीय अधिकाऱ्यांपासून सामान्य तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले ‘आपले सरकार’सारखे व्यासपीठ, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन याद्वारे सीएसआरच्या निधीतून सुरू झालेली ग्रामीण भागातील विकासकामे, जलयुक्त

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language