करोना विषाणूबद्दलचे सहा गैरसमज आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली वस्तुस्थिती... पाहा व्हिडिओ (मराठी सबटायटल्ससह)
गैरसमज १ : हा विषाणू उष्ण आणि आर्द्र हवामानात जिवंत राहत नाही.
वस्तुस्थिती : हा विषाणू कोणत्याही हवामानात प्रसारित होऊ शकतो.
गैरसमज २ : डास चावल्यामुळे तुम्हाला या विषाणूची लागण होऊ शकते.
वस्तुस्थिती : डासांच्या माध्यमातून हा विषाणू पसरत असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. तो नाका-तोंडातील थेंबांतून (थुंकी, शिंक) पसरतो.
गैरसमज ३ : न्यूमोनिया व्हॅक्सिनमुळे या विषाणूचा प्रतिबंध होतो.
वस्तुस्थिती : करोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र लशीची आवश्यकता असून, शास्त्रज्ञ लस विकसित करत आहेत.
गैरसमज ४ : अँटिबायोटिक्स हा करोना विषाणूवरील प्रभावी उपचार आहे.
वस्तुस्थिती : अँटिबायोटिक्स केवळ जिवाणूविरोधात (बॅक्टेरिया) काम करतात, विषाणूविरोधात (व्हायरस) नाही.
गैरसमज ५ : करोना विषाणूशी लढण्यासाठी लसूण खाणे हितकर आहे.
वस्तुस्थिती : लसूण खाल्ल्यामुळे कदाचित लोक दूर राहू शकतील; पण या उपायाचा करोना विषाणूशी लढण्यासाठी काहीही उपयोग नाही.
गैरसमज ६ : या विषाणूची लागण होण्याचा धोका केवळ वृद्धांना आहे.
वस्तुस्थिती : या विषाणूची लागण कोणालाही होऊ शकते.
महत्त्वाचे :
दमा, मधुमेह, हृदयरोग आदी विकार असलेल्यांना करोना विषाणूची लागण झाल्यास गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता जास्त.
साबणाने हात नियमितपणे धुऊन तुमचे आणि तुमच्या संपर्कात येणाऱ्यांचे संरक्षण करा.
खोकताना, शिंकताना तोंड रुमालाने झाकून घ्या...
खोकला, ताप असलेल्यांशी निकटचा संपर्क टाळा.
तुम्ही जेथे राहता, तेथील सार्वजनिक यंत्रणांकडून दिले जाणारे आरोग्य सल्ले पाळा.
Video Courtesy : World Economic Forum
Medical Information : World Health Organization
Marathi Translation : Bytesofindia.com