Ad will apear here
Next
‘पीपीबीएल’ बनली नफा नोंदवणारी भारतातील पहिली पेमेंट्स बँक
मुंबई : पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (पीपीबीएल) आपल्या संचालनाला दोन वर्षे पूर्ण झाली असल्याची घोषणा नुकतीच केली. संचालनाच्या दुसऱ्याच वर्षात नफा कमावणारी ‘पीपीबीएल’ ही भारतातील पहिली पेमेंट्स बँक बनली आहे. कंपनीने २०१८-१९ या आर्थिक वर्षात १९ कोटी रुपयांच्या नफा वृद्धीची नोंद केली आहे.

मार्च २०१९मध्ये १९ टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट शेअरसह ‘पीपीबीएल’ मोबाइल बँकिंग व्यवहारांत आघाडीवर आहे. भारतातील एकूण मोबाइल बँकिंग व्यवहारांच्या सुमारे एक तृतीयांश व्यवहारांचे संचालन ‘पीपीबीएल’द्वारे केले जाते आणि वार्षिक तीन लाख कोटींपेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल व्यवहारांची नोंद कंपनीद्वारे केली जाते. देशातील एकूण डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत पाहिल्यास ‘पीपीबीएल’ ही भारतीय स्टेट बँकेच्या मागोमाग येणारी बँक आहे. भारतात जास्तत जास्त रुपे कार्ड जारी करणारी ही बँक आहे. ‘पीपीबीएल’ने ४५ दशलक्षपेक्षा जास्त ग्राहकांना त्यांच्या खात्याची रुपे डेबिट कार्ड जारी केली आहेत. ही बँक व्यक्तींना, सोल प्रोप्रायटर्सना, एसएमइज आणि मोठ्या कॉर्पोरेट्सना शून्य बॅलन्स करंट खात्याची सुविधा देते, ज्यात पैसे भरण्यावर, काढण्यावर, व्यवहारांच्या संख्येवर व रकमेवर कोणतेही निर्बंध नाहीत.

पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार गुप्ता म्हणाले, ‘गेल्या वर्षात आमच्या बँकेची कामगिरी उत्कृष्ट होती आणि उत्तम निकालांसह हे वर्ष पूर्ण झाले आहे. संचालन सुरू केल्यानंतर केवळ दोनच वर्षांत नफा जाहीर करणारी ही देशातील पहिली पेमेंट बँक बनली आहे. ग्राहकांनी आमच्या सेवेत दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले की, एप्रिल २०१९ मध्ये आमच्या बचत खात्यांमध्ये ५०० कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत, म्हणजे ठेवींच्या बाबतीत आम्ही भारतातील सर्वांत मोठी पेमेंट बँक ठरत आहोत. आर्थिक वर्ष २०२०मध्ये मासिक सेव्हिंग अकाउंट पेमेंट २४ हजार कोटींपासून ४० हजार कोटींपर्यंत वाढवण्यासाठी आमच्या मंचावर आणखी उत्पादने आणि फीचर्स देण्याचे आमचे लक्ष्य आहे. भारतातील पसंतीची पेमेंट्स बँक म्हणून स्वतःला दृढपणे स्थापित केल्यानंतर आम्ही संपूर्ण बँकिंग उद्योगात डिजिटल व्यवहार करणारी आघाडीची बँक ठरलो आहोत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZOACA
Similar Posts
‘पेटीएम बँके’ला नवीन ग्राहक स्वीकृतीसाठी ‘आरबीआय’ची मान्यता मुंबई : भारताची सर्वात मोठी डिजिटल बँक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) ३१ डिसेंबर २०१८ पासून बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी केवायसी सुरू ठेऊन नवीन ग्राहक स्वीकारण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संभाव्य ग्राहकांना आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडता येणार आहे
‘पेटीएम’ची ‘झोमॅटो’सह भागीदारी मुंबई : पेटीएम या डिजिटल पेमेंट कंपनीची मालकी असलेल्या ‘वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ने ‘झोमॅटो’शी भागीदारी करत असल्याचे जाहीर केले असून, त्यांच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून फूड आणि डिलिव्हरी ऑर्डर करता येणार आहे. या मुळे यूझर्स आता आपल्या पेटीएम अॅपमधून आपले आवडते रेस्टोरंट शोधून तत्काळ खाद्यपदार्थ मागवू शकतील
‘पेटीएम’तर्फे ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’चे सादरीकरण मुंबई : ‘पेटीएम’च्या ‘गेमपिंड’ या डिजिटल गेमिंग मंचातर्फे क्रिकेट प्रेमींसाठी आणि कार्ड गेमच्या चाहत्यांसाठी ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’च्या सादरीकरणाची घोषणा केली आहे. ‘गेमपिंड’ने देश-विदेशांतील उच्च गुणवत्तेच्या स्टुडिओज आणि प्रकाशकांशी भागीदारी केली आहे.
‘यूपीआय’साठी पेटीएम सुरक्षित व्यासपीठ मुंबई : देय, बॅंकिंग, कर्ज आणि विमा भरण्याची सेवा देणारी भारताची सर्वात मोठी मोबाइल-फर्स्ट आर्थिक सेवा कंपनी पेटीएम यूपीआय व्यवहारांसाठी सर्वात सुरक्षित व्यासपीठ आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language