Ad will apear here
Next
‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला
‘एक हात मदतीचा’ उपक्रमात सहभागाचे आवाहन

पुणे : पुराच्या तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील गावांमध्ये अनेक ठिकाणांहून मदत पोहोचत आहे; पण आभाळच कोसळल्यावर ठिगळ तरी कुठे, कुठे लावणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे या मदतीच्या हातांमध्ये आपलाही एक हात असावा या उद्देशाने आर्यन्स वर्ल्ड स्कूल संस्थेने पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता संस्थेचे सहाशे कर्मचारी आणि आतापर्यंत नावनोंदणी केलेले साधारण सातशे पालक असे तेराशे लोक टप्प्याटप्याने  १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत मदतकार्य करणार आहेत. गावांमध्ये जाऊन स्वच्छ्ता करणे हा या तुकडीचा मुख्य उद्देश असून, त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. 

ज्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी येता येणार नाही, ते वस्तूरूपाने मदत करू शकतात. आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या सर्व शाखांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मदत देता येईल. यामध्ये मेणबत्ती, चादर, सतरंजी, मॅगी पॅकेट, झाडू, खराटा, सुपली, मिल्क पावडर, बिस्कीट, बेडशीट, लायटर, सॅनिटरी नॅपकिन, तुरटी, सॅव्हलॉन, प्लास्टिक कॅन, औषधे स्वीकारली जातील. दिलेल्या गोष्टींची पोचपावती दिली जाईल.

प्रत्यक्ष गावात जाऊन काम करू इच्छिणाऱ्या लोकांनी संस्थेकडे नावनोंदणी करावी. त्यामुळे तुकड्या करणे, जाण्या-येण्याचे, कामाचे नियोजन करणे सोपे जाईल.

नावनोंदणी संपर्क : संदीप माळी : ९१३०० ६४४८८
स्थळ : आर्यन्स वर्ल्ड स्कूल, दत्तनगर 
वेळ : १४ ऑगस्ट, सकाळी ८:३० ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZVACD
Similar Posts
कॅटलिस्ट फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत पुणे : ‘पुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कॅटलिस्ट फाउंडेशन वस्तू रुपात मदत गोळा करून देणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे
पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे पूरग्रस्तांसाठी ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू रवाना पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.
युनिक स्कूलतर्फे पूरग्रस्तांना मदत पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून ईगल एज्युकेशन सोसायटीच्या युनिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली. धान्य, कपडे, टिकाऊ कोरडे खाद्यपदार्थ, चादर, शाल, रग, स्वेटर आदींचा यात समावेश होता.
पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून १०० घरे उभारण्याचा ‘बालोद्यान’चा संकल्प पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून शंभर नवी घरे बांधण्याचा संकल्प मूळचे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे आणि आता पुण्यात स्थायिक असणारे कुलभूषण बिरनाळे आणि अन्य समविचारी व्यक्तींनी केला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language