Ad will apear here
Next
सोशल मीडिया आणि व्यावसायिक जग
‘सोशल मीडिया’ हा आजच्या युगाचा परवलीचा शब्द आहे. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे, प्रभावी वापर केल्यास अनेक आश्चर्ये घडू शकतात. त्यासाठीचे मूलभूत मार्गदर्शन योगेश बोराटे यांनी ‘सोशल मीडिया’ या पुस्तकातून केले आहे. या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत. 
.................
सोशल मीडियाची विविध व्यासपीठे विकसित होत असताना, ही व्यासपीठे वेगवेगळ्या उद्देशाने वापरण्यासाठी विशिष्ट पद्धतीने काम करण्याची गरज निर्माण होऊ लागली. त्याच जोडीने अशा प्रत्येक व्यासपीठाचा, व्यासपीठाच्या वैशिष्ट्यांचा, संबंधित व्यासपीठाचा विशिष्ट उद्देशाने होणाऱ्या वापराचा अभ्यासही क्रमप्राप्तच ठरला. अशा अभ्यासामधून ही व्यासपीठे विशिष्ट पद्धतीने वापरण्यासाठीची ‘सोशल मीडिया पॉलिसी’ अर्थातच ही व्यासपीठे वापरण्यासाठीची धोरणे पुढे येऊ लागली आहेत. केवळ व्यावसायिक उद्देशांसाठीच नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरील आशयनिर्मितीच्या प्रभावी प्रचार - प्रसारासाठीही धोरणे अधिकाधिक उपयुक्त ठरत चालली आहेत. 

सोशल मीडिया पॉलिसी अर्थात सोशल मीडिया वापरण्यासाठीचे धोरण :
सोशल मीडिया वापरणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींना आपल्या पोस्ट्समध्ये गुंतवून ठेवण्यासाठी सोशल मीडिया धोरणांचा वापर केला जातो, असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे प्रचलित आहे; मात्र या धोरणांच्या आधारे सरळ हीच एक गोष्ट साध्य होते असे नाही. अशा धोरणांची नेमकी गरज सांगणारे मुद्दे जाणून घेतल्यास, ही बाब नेमकेपणाने स्पष्ट होते. त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने सोशल मीडिया वापरण्यासाठी, वेळेची बचत करण्यासाठी, सोशल मीडियावरून अधिक प्रभावी संवाद प्रसारित करण्यासाठी, अधिक कल्पक आशयनिर्मितीसाठी म्हणूनही अशा धोरणांचा विचार केला जातो. 

नियोजनबद्ध पद्धतीने सोशल मीडिया वापरण्यासाठी - व्यक्तिगत पातळीवर सोशल मीडियाच्या होणाऱ्या वापराला दिशा देण्यासाठी सोशल मीडिया धोरणांचा वापर शक्य आहे. सोशल मीडियाच्या वापरामागचा निश्चित हेतू विचारात घेऊन सोशल मीडियावरील आपला वावर वाढविण्यासाठी अशी धोरणे उपयुक्त ठरतात. सोशल मीडियाचा वापर म्हणजे केवळ वेळखाऊ कृती नव्हे, तर एक उपयुक्त उपक्रम म्हणूनही सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी ही धोरणे दिशा देतात. 

वेळेची बचत : सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सोशल मीडियाचा होणारा वापर ही एक वेळखाऊ प्रक्रिया ठरल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. सोशल मीडियाचे व्यासपीठ उघडल्यानंतर, त्यावर नेमकेपणाने काय सांगा-बोलायचे आहे, याचे कोणतेही नियोजन नसल्याने आपण केवळ स्क्रीनवर स्क्रोल करत राहतो. यामध्ये आपला बराचसा वेळ आपण खर्ची घालतो. त्यानंतर एका विशिष्ट पद्धतीने आपण आपल्या भावना व्यक्त करण्याचा विचार करू लागतो. आपल्याला नेमके काय सांगायचे आहे, याचे नियोजन हाती असल्यास हा वेळ आपण वाचवू शकतो. सोशल मीडिया वापरण्यासाठीच्या धोरणाच्या अंमलबजावणीतून असा वेळ वाचविणे शक्य होते. हा वाचलेला वेळ आपण सोशल मीडियाच्या आपल्या वापराच्या विश्लेषणावर, आपल्याला मिळालेल्या प्रतिसादाच्या विश्लेषणासाठीही वापरू शकतो. 

आपल्या पाठीराख्यांशी आणि अपेक्षित लक्ष्यगटासोबत अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी - सोशल मीडियाची वेगवेगळी व्यासपीठे नेमकी कशी काम करतात, हे जाणून घेतल्यानंतर संबंधित व्यासपीठांवर पाठिराख्यांना अधिकाधिक गुंतवून ठेवण्यासाठी नेमके काय करावे लागते, याचीही कल्पना आपल्याला येत जाते. त्यासाठी आपल्या धोरणामध्येच विशेष तरतुदी करण्याची काळजी आपल्याला घेता येते. त्यातून आपल्या पाठिराख्यांसोबत होणारा आपला संवाद अधिकाधिक प्रभावी ठरवण्यास मदत होत राहते. 

सर्जनशीलतेला चालना देत अधिक चांगल्या आशयनिर्मितीसाठी :
नियोजनबद्ध पद्धतीने आशयाच्या निर्मितीसाठी आपल्याला हाती असलेले नानाविध पर्याय, आशय निर्मितीसाठीच्या वेगवेगळ्या पद्धती, आपल्या संपर्कातील इतरांचे अनुभव आदी बाबींचा विचार करणे शक्य असते. आपल्या वैयक्तिक अनुभवातूनच नव्हे, तर इतरांना आलेल्या अनुभवाच्या आधारानेही आपण आशयनिर्मितीचा विचार करू शकतो. त्यातून अधिकाधिक रंजक पद्धतीने आशयाचा विकास करणे शक्य होत जाते. विशिष्ट व्यासपीठांसाठी म्हणून अशा आशयनिर्मितीचा विचार होत असतानाच, दुसरीकडे आपल्याला संबंधित व्यासपीठावर उपलब्ध असणाऱ्या तांत्रिक पर्यायांचाही अधिक प्रभावीपणे वापर करून घेता येतो. या सर्व बाबी सोशल मीडिया वापरण्यासाठीच्या धोरणाचाच एक भाग बनतात.

(‘सोशल मीडिया’ हे योगेश बोराटे यांनी लिहिलेले पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZFRCH
Similar Posts
सोशल मीडिया ‘सोशल मीडिया’ या पुस्तकाचा अल्प परिचय....
फेसबुकची मोहनिद्रा ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’ इत्यादी ‘बुलेट ट्रेन्स’ भरधाव वेगाने पुढे जात आहेत. त्यांना शेवटचे स्टेशन नाही किंवा परतीचा प्रवास नाही. आपण त्यांच्यासह प्रवासात टिकून राहिले पाहिजे, किंवा वाटेतल्या एखाद्या स्टेशनवर उतरले पाहिजे. चार फेब्रुवारी हा फेसबुकचा स्थापना दिवस. त्या निमित्ताने, ‘किमया’ सदरात रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत ‘फेसबुकच्या मोहनिद्रे’बद्दल
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
मार्स मेलविन.. विशीपूर्वीच मेलविन मार्स अमेरिकेतील सर्वांत प्रसिद्ध फुटबॉलपटू बनला. भविष्याची ददात मिटेल असा करार होण्याआधीच स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्याला देहान्ताची शिक्षा बजावण्याच्या काही सेकंद आधी एकाने ते खून केल्याची कबुली दिल्याने मेलविनची सुटका झाली. त्यामागे अनेक रहस्ये दडलेली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language