फुरसुंगी (पुणे) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या मध्य हवेली तालुका मंडल अध्यक्षपदी फुरसुंगी येथील ज्ञानेश्वर देशमुख यांची निवड झाली आहे. भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पंडित मोडक यांनी देशमुख यांना निवडीचे पत्र दिले. या वेळी धनंजय कामठे, पांडुरंग रोडे, योगेश ढोरे, संतोष हरपळे, सुजित मोडक, पांडुरंग गोरे, केतन अडसूळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी देशमुख यांनी भाजप सरकारच्या योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.