Ad will apear here
Next
सिद्धार्थ चांदेकरने सेटवर साजरा केला आईचा वाढदिवस


मुंबई : ‘स्टार प्रवाह’वर २२ एप्रिल २०१९पासून सुरू होणाऱ्या ‘जिवलगा’ या मालिकेच्या सेटवर नुकतेच एक सेलिब्रेशन पार पडले. निमित्त होते ते सिद्धार्थ चांदेकर याच्या आईच्या वाढदिवसाचे. रिअल लाइफमधली माय-लेकाची ही जोडी रिल लाइफमध्येही आई-मुलाच्या भूमिकेत आहे.

‘जिवलगा’ या मालिकेच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि त्याची आई पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. सध्या या मालिकेचे चित्रीकरण सुरू असून, आईचा ५२वा वाढदिवस विशेष बनविण्यासाठी त्याने ‘जिवलगा’च्या सेटवर वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले. त्याच्या या नियोजनात ‘जिवलगा’च्या संपूर्ण टीमने त्याला मदत केली आणि वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

सिद्धार्थ आणि ‘जिवलगा’च्या संपूर्ण टीमकडूम मिळालेले हे खास ‘सरप्राइज’ पाहून सिद्धार्थची आई भारावून गेली होती. ‘आयुष्यातले काही क्षण न विसरता येणारे असतात. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय वाढदिवस आहे. हे आनंदाचे क्षण मला दिल्याबद्दल सिद्धार्थ आणि जिवलगाच्या संपूर्ण टीमचे आभार,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZSQBZ
Similar Posts
‘जिवलगा’ ‘हॉटस्टार’वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका मुंबई : अल्पावधीतच लोकप्रिय ठरत असलेल्या ‘जिवलगा’ या ‘स्टार प्रवाह’वरील मालिकेला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ही मालिका ‘हॉटस्टार’वर सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. ‘टिकटॉक’ आणि ‘हॅलो’सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरही ‘जिवलगा’ हॅशटॅग ट्रेंड होत असून, तरुणाईमध्ये या मालिकेविषयी प्रचंड कुतूहल असल्याचे समोर आले आहे
स्वप्नील जोशी निर्मितीत मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली ‘नकळत सारे घडली’ ही मालिका २७ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच सादर  झाला असून, एक रंगतदार प्रेमकहाणी या मालिकेत पहायला मिळेल असा अंदाज त्यावरून येतो
‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार मुंबई : टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीनं नुकताच हा सुखद अनुभव घेतला. स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेनं प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला, सोबतच रेवती आणि श्रीधर या जोडीला भेटण्याची संधीही त्यांना मिळाली
‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू मुंबई : आजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचे चित्रण करण्यात आले आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असते, प्रेमाची भावना गुलाबी असते, असे दाखवण्यात आले. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू ‘स्टार प्रवाह’ ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेतून मांडणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language