Ad will apear here
Next
‘एआयआयबी’ची भारतात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टसाठी ५०० दशलक्ष डॉलर

मुंबई :  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) भारताला आतापर्यंत सुमारे तीन अब्ज डॉलर्सचा अर्थपुरवठा केला आहे. बँकेने भारतातील गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला आहे.   

‘एआयआयबी’च्या संचालक मंडळाने ऑक्टोबरमध्ये दोन प्रकल्पांसाठी एकूण ५७५ दशलक्ष डॉलर्सची मंजुरी दिली आहे. अपारंपरिक ऊर्जा, पॉवर ट्रान्समिशन व जल पायाभूत सुविधा यातील खासगी भांडवल गुंतवणुकीला चालना देण्याची अपेक्षा आहे.

भारत सरकारला देण्यात आलेल्या ५०० दशलक्ष डॉलर्सच्या कर्जामुळे मुंबईतील उपनगरी रेल्वे जाळ्यातील कामाला गती मिळणार आहे. हा निधी, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरांना जोडण्याच्या हेतूने उपनगरी रेल्वे सेवेचा विस्तार करण्यासाठी योगदान देणार आहे. या प्रकल्पात पनवेल व कर्जत या भागांदरम्यान नवे उपनगरी रेल्वे कॉरिडॉर (२८  किलोमीटर) बांधले जाणार आहेत.

‘गेल्या चार वर्षांमध्ये, ‘एआयआयबी’ची भारतातील गुंतवणूक लक्षणीयरित्या वाढली आहे. बँक भारताच्या विकासासाठी पाठिंबा देत असल्याने, यापुढे सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार बँक आपली धोरणे आखणार आहे,’ असे ‘एआयआयबी’चे उपाध्यक्ष व मुख्य गुंतवणूक अधिकारी डी. जे. पांडियन यांनी सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZVRCG
Similar Posts
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे तीन नव्या योजना मुंबई : देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना शतकाहून जास्त काळ सर्वसमावेशक बँकिंग सेवा देणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी १०१वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी या बँकेतर्फे तीन नवीन सुविधा दाखल करण्यात आल्या.
भारतात गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक पुणे : ‘भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही देशांच्या प्रगतीला पूरक आहेत. व्यवसाय, शिक्षण, आयटी, संशोधन, आरोग्य, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक आहोत. महाराष्ट्रात जपानी कंपन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी
मानवी साखळीतून सनदी लेखापालांना मानवंदना पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने ‘सीए’च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language