Ad will apear here
Next
‘शाळा सिद्धी’ उपक्रमात पुणे अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘शाळा सिद्धी’ या उपक्रमांतर्गत राज्यातील केवळ नऊ हजार शाळा ‘अ’ श्रेणीस पात्र ठरल्या असून, पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अव्वल शाळांना मानांकन देण्याचा हा उपक्रम प्रथमच हाती घेतला आहे.

या उपक्रमात पुणे विभाग पहिल्या स्थानावर असून, कोकण विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, मुंबई, लातूर यांचा क्रमांक लागतो. जिल्हानिहाय याचा अभ्यास केला असता पुणे, सोलापूर आणि ठाणे हे तीन जिल्हे या मूल्यमापनात अव्वल ठरले आहेत. 

राज्यातील शंभर टक्के शाळा प्रगत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. या उपक्रमामुळे  त्यास चालना मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक शाळेने काही ठराविक निकषांवर स्वतःचे मूल्यमापन करून ‘अ’ श्रेणीसाठी दावा करणे अपेक्षित होते. परंतु या निकषांनुसार पहिल्या फेरीत प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरांवरील केवळ नऊ हजार ३७० शाळाच ‘अ’ श्रेणीसाठी दावा करू शकल्या आहेत. शाळांनी हे मूल्यमापन सादर केल्यानंतर विद्या प्राधिकरणाने या शाळांची यादी घोषित केली. शिक्षण विभागातर्फे तयार करण्यात आलेला ‘निर्धारक’ गट या ‘अ’ श्रेणीसाठी निवड झालेल्या शाळांची तपासणी करणार आहे.

या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारच्या तपासणीत ‘अ’ दर्जा सिद्ध करू शकलेल्या शाळांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येतील आणि नंतर मग देशपातळीवर या शाळांचे मूल्यांकन होणे अभिप्रेत आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZKEBB
Similar Posts
ठाण्यात शिवसेना 20, राष्ट्रवादी 18 जागांवर आघाडीवर राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 267 उमेदवारांमध्ये लढत होत आहे
फक्त अडीच हजारांत ‘उडान’ नवी दिल्ली : ‘उडान’ या योजनेअंतर्गत देशात तासाभराचा विमान प्रवास केवळ अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकांना विमानप्रवास अनुभवता यावा यासाठी ‘उडे देश का आम नागरिक’ ऊर्फ ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक,
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language