Ad will apear here
Next
‘दिव्यांग मतदारांना सुविधा देताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करा’
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन


पुणे : ‘भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्‍यांग मतदारांना (पीपल विथ डिसअॅबिलीटी-पीडब्ल्‍यूडी) आवश्‍यक सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, याची विशेष काळजी घ्यावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच समन्वय अधिकारी यांच्याशी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी २५ मार्च २०१९ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. मतदार नोंदणी मोहीम, दिव्यांग मतदार सुविधा, आचारसंहिता भंग आणि फ्लाइंग स्कॉड आदींबाबत त्यांनी सूचना दिल्या.

डॉ. म्‍हैसेकर यांनी जिल्‍हानिहाय निवडणूक तयारीचा आढावा घेतला. बैठकीत निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांची माहिती, जिल्‍हा प्रशासनाची तयारी त्‍यांनी जाणून घेतली. ‘एकही मतदार सुटता कामा नये’, हे यंदाच्‍या निवडणुकीचे ब्रीदवाक्‍य असून, सर्व पात्र मतदारांबाबत विशेषत: दिव्‍यांग मतदारांबाबत अधिक जागृत राहण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. मतदान केंद्रांवर पिण्‍याचे पाणी, स्‍वच्‍छतागृह, रॅम्‍प, वीजेची सोय, दिव्यांग मतदारांना मतदान कक्षात जाताना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती सुविधा उपलब्‍ध राहावी, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी ‘एनसीसी’, ‘एनएसएस’, ‘स्काउट-गाइड’ त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या; तसेच दिव्यांग मतदारांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याबरोबच त्यांना मतदानासाठी रांगेत थांबून राहायला लागू नयेत याची काळजी घेतली जावी यांची काळजी घेण्याबाबत त्यांनी सांगितले.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी भरारी पथकासह इतर पथकांमध्‍ये समन्‍वय ठेवण्‍याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. मतदान यंत्र आणि व्‍हीव्‍हीपॅटबाबत पोलिस विभागासह सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्‍ये प्रात्‍यक्षिके दाखवून जनजागृती करावी, शंकानिरसन करावे, अशा सूचना त्‍यांनी दिल्‍या. सी-व्‍हीजील अॅपवर येणाऱ्या तक्रारींबाबत ताबडतोब कार्यवाही करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी आदेश मिळाल्‍यावर कार्यवाही करण्‍यापेक्षा सक्रिय राहून कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

डॉ. म्हैसेकर यांनी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या सर्वच विभागांना आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. आदर्श आचारसंहिता देशभर लागू असून रेल्‍वे, डाक विभाग, कृषी, बँका यांच्‍यासह शासकीय- निमशासकीय संस्‍थांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्‍यक आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कार्यवाही होईल, असेही त्‍यांनी स्पष्ट केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZKUBY
Similar Posts
‘मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून मतदान प्रक्रिया पार पाडा’ पुणे : ‘भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्‍या.
‘निवडणूक कालावधीत बँकांनी आयोगाच्या सूचनांचे पालन करावे’ पुणे : ‘पुणे विभागातील सर्व बँकांनी निवडणूक कालावधीतील बँकिंग व्यवहार व उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
‘खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करावे’ पुणे : खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.
‘निवडणुकीचे काम करताना गोंधळून जाऊ नका’ पुणे : ‘निवडणुकीचे काम करताना गोंधळून जाऊ नका, तुमच्‍या कार्यक्षमतेवर आमचा विश्‍वास आहे, पण तुमचा स्‍वत:वर विश्‍वास असला पाहिजे,’ अशा शब्‍दांत विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा उत्‍साह वाढवला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language