खरपुडी (जालना) : ‘संकल्प ते सिध्दी’ या कार्यक्रमांतर्गत कृषी विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

‘आज देशात शेतकरी हिताचा विचार करणारे सरकार काम करत असून, सन २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी मोदी उपाययोजना करत आहेत,’ असे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे म्हणाले.

या वेळी आदर्श शेतकरी विजय अण्णा बोराडे (पाणी व्यवस्थापन तज्ञ), आमदार नारायण कुचे, अरविंद अण्णा चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी तसेच, डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल, जिल्हा कृषी अधीक्षक बी. जी. बिराजदार, सहयोगी संशोधन संचालक व्ही. एम. अमृतसागर, प्रगतीशील शेतकरी नवनाथ कसपटे, डॉ. एल. आर. तांबडे, शास्त्रीय सल्लागार समितीचे राजेंद्र देशमुख, शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला व पुरूष उपस्थित होते.