Ad will apear here
Next
‘नव्या पिढीवर विश्वास, जबाबदारी टाकावी’
उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांचे मत; शेंडे, कुलकर्णी यांना ‘युवा पुरस्कार’ प्रदान
‘युवा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी (डावीकडून) केदार कुलकर्णी, गणेश कुलकर्णी, श्रीकृष्ण चितळे, बेला शेंडे, चारुहास पंडित, विश्राम कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, श्रीकांत जोशी आदी.

पुणे : ‘उद्योग उभारताना आणि वाढविताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी असायला हवी. नव्या पिढीवर विश्वास टाकून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली, तर तेही जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. एखाद्या मुलाच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार आला, तर पालकांनी त्याला पाठबळ द्यायला हवे,’ असे मत उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) अकराव्या वर्धापन दिनानिमित्त कै. चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘युवा उद्योजक पुरस्कार’ महाभृंगराज तेल कंपनीचे गणेश आणि केदार कुलकर्णी यांना, तर सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत ‘सृजन युवा पुरस्कार’ गायिका बेला शेंडे यांना श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी राजन कुलकर्णी व शौनक पानसे यांना युवा उत्कर्ष पुरस्काराने, तर नारायण पेठेतील आपली राहती वास्तू देणगीस्वरुपात देणाऱ्या डॉ. अनिल गांधी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत जोशी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, डॉ. संजय जोशी, ‘युवा’चे श्रीकांत जोशी, सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित, मंजुषा वैद्य, तृप्ती नानल, मिलींद दार्वेकर आदी उपस्थित होते.


श्रीकृष्ण चितळे म्हणाले, ‘व्यवसायात नवीन गोष्टी आत्मसात करताना ग्राहकांच्या मागणीचाही आदर केला पाहिजे. आम्ही दुग्ध पदार्थांबरोबर बाकरवडी सुरू केली. त्यानंतर बाकरवडी तयार करण्यासाठी मशीन घेण्याचा विचार केला. तेव्हा वडिलांनी आणि काकांनी पाठिंबा दिला. आज मशीनवर बाकरवडी केली जाते. दिवसाला सहा टन बाकरवडी बनते. सहनशीलतेचा वसाही आम्ही व्यवसाय पुढे नेताना जपला आहे.’

बेला शेंडे म्हणाल्या, ‘गायनाचा वारसा असला, तरी मेहनत आणि रियाज महत्त्वाचा आहे. करिअरमध्ये चढ-उतार आले, तरी तुम्ही सामोरे कसे जाता यावर यश अवलंबून असते. प्रत्येक गाणे नवे आव्हान असते. त्यासाठी सतत सराव करते.’

विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा कुर्डुकर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZUOCF
Similar Posts
बेला शेंडे, गणेश कुलकर्णी, केदार कुलकर्णी यांना ‘युवा’ पुरस्कार पुणे : ‘शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानाच्या (युवा) अकराव्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘युवा उद्योजक पुरस्कार’ यंदा महाभृंगराज तेल कंपनीचे गणेश कुलकर्णी आणि केदार कुलकर्णी यांना, तर सृजन आर्ट
‘उद्योगांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक’ पुणे : ‘अत्यंत अद्ययावत असे ‘इंडस्ट्री फोर पाँईंट झीरो’ तंत्रज्ञान, ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘मशीन लर्निंग’ हे आजच्या जगातील परवलीचे शब्द झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील ही आव्हाने असून, लवकरात लवकर त्यांचा सामना करून नवे तंत्रज्ञान अवगत करून
देशातील दुसरे रिट्झ-कार्ल्टन हॉटेल पुण्यात सुरू पुणे : आलिशान हॉटेल्सचा आघाडीचा ब्रँड म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या रिट्झ-कार्ल्टनचे पुण्यात आगमन झाले आहे. भारतातील हे दुसरे रिट्झ-कार्ल्टन हॉटेल आहे. यामुळे आदरातिथ्य क्षेत्रातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित झाले असून, पुण्याच्या दिमाखात अधिकच भर पडली आहे. येरवडा परिसरातील गोल्फ कोर्सजवळ ‘बिझनेस बे’लगत हे अलिशान हॉटेल साकारले आहे
‘दीर्घ काळातील मोठ्या लाभासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर’ पुणे : ‘भविष्यात सोन्यातील गुंतवणुकीवर आजच्याइतके फायदे मिळणे शक्य नाही; मात्र शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील फायदा वाढवणे शक्य आहे. जोखीम घेऊनदेखील फायदेशीर गुंतवणूक करणे म्युच्युअल फंडाद्वारे शक्य आहे. ३० वर्षांत आपण केलेल्या गुंतवणुकीच्या चार ते ४० पट वाढ होण्याची क्षमता म्युच्युअल फंडातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language