Ad will apear here
Next
देवराई
निसर्ग आणि श्रद्धा यांचा मेळ घालीत झाडे जोपासण्याच्या पद्धतीतूनच देवराया निर्माण झाल्या; पण पुढे नागरीकरणामुळे मानवाचा निसर्गाशी संपर्क तुटत चालला; मात्र अजूनही ग्रामीण भागात देवरायांचे अस्तित्व दिसते. या देवरायांचा अभ्यास व संशोधन डॉ. उमेश श्रीराम मुंडल्ये यांनी केले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण संवर्धन व संरक्षणाच्या पद्धतीबद्दल त्यांनी ‘देवराई’ या पुस्तकातून माहिती दिली आहे. देवराई ही संकल्पना, वेगवेगळे पैलू, देवराईपुढील आव्हाने मांडून देवराया वाचवण्याचे उपायही सुचवले आहेत. हे उपाय कोणी करायचे याबद्दलही त्यांनी सांगितले आहे. देवाच्या नावाने जंगलात राखून ठेवलेला पट्टा म्हणजे देवराई. त्याचे जतन पिढ्यान् पिढ्या केले जाते. तेथे वृक्षतोडीला बंदी असते. अशी देवराई कशी असते, याचे वर्णन पुस्तकात केले आहे. देवराईतील वनसंपदा, औषधी व दुर्मीळ वनस्पती, कीटक, पशुपक्षी, देवराईमधील महालता अर्थात राक्षसी वेल, देवराईतील पाण्याचे स्रोत, तेथील देवदेवता, देवराई व समाज याविषयी या पुस्तकात वाचायला मिळते. याचबरोबर सध्याच्या आधुनिक वातावरणात देवरायांचे स्थान, त्या वाचविण्याची गरज, आव्हाने व उपाय अन् त्यासाठी काम करण्याची जिद्द यांबद्दलही या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

पुस्तक : देवराई
लेखक : डॉ. उमेश श्रीराम मुंडल्ये
प्रकाशक : हिंदुस्थान प्रकाशन संस्था
पृष्ठे : १२८
मूल्य : १७५ रुपये

(‘देवराई’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZTHCD
Similar Posts
छत्रपती शिवाजी अँड सुराज्य ‘छत्रपती शिवाजी अँड सुराज्य’ या पुस्तकाचा अल्प परिचय...
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
गुलमोहराशी संवाद साधताना... माणसाच्या जगण्याचाच एक भाग असलेला निसर्ग माणसाला खूप काही शिकवत असतो. असे असताना अर्थातच माणसाने त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे अपेक्षित आहेच. या निसर्गाचाच एक भाग असलेला घटक म्हणजे झाड, वृक्ष. प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे धडे देणाऱ्या या वृक्षांप्रति आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक अनोखा उपक्रम
विखे-पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले राज्यांचे चित्ररथ पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त विखे-पाटील मेमोरियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक चित्ररथांनी सर्वांची मने जिंकून घेतली. गेल्या वर्षीपासून शाळेने वेगवेगळ्या राज्यांची माहिती देणारे चित्ररथ बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यंदा आसाम, गुजरात, पंजाब आणि कर्नाटक या चार राज्यांचे चित्ररथ साकारण्यात आले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language