Ad will apear here
Next
सूर्यदत्ता अॅनिमेशन इन्स्टिट्यूट देशातील पहिल्या तीन संस्थांमध्ये
अॅनिमेशन तज्ज्ञ धीमंत व्यास यांच्या हस्ते सत्कार
‘टॉप अॅनिमेशन एज्युकेशन ब्रँड्स २०१९’मध्ये धीमंत व्यास यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सिद्धांत चोरडिया व अॅनिमेशन विभागाचे प्रमुख प्रा. अंकित जैन.

पुणे : देशातील पहिल्या तीन क्रमांकाच्या अॅनिमेशन प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सूर्यदत्ता’च्या अॅनिमेशन इन्स्टिट्यूटने स्थान मिळवले आहे. ‘टॉप अॅनिमेशन एज्युकेशन ब्रँड्स २०१९’मध्ये व्हिसलिंग वूड्स, पिकासो, एनआयडी यासारख्या नामवंत संस्थांबरोबर ‘सूर्यदत्ता’च्या अॅनिमेशन इन्स्टिट्यूटचा सन्मान करण्यात आला. यामुळे ‘सूर्यदत्ता’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

‘तारे जमीं पर’ चित्रपटाचे अॅनिमेशन फिल्म डिझायनर, झिंगा गेम्स इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर धीमंत व्यास यांच्या हस्ते मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सूर्यदत्ता अॅनिमेशन इन्स्टिट्यूटला सन्मानित करण्यात आले. अॅनिमेशन विभागाचे प्रमुख प्रा. अंकित जैन आणि सिद्धांत चोरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

याबाबत बोलताना संस्थेचे संस्थापक संचालक प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग संवाद, कौशल्य विकास, शिक्षण संसाधने यावर संस्था नेहमीच भर देते. ॲनिमेशनच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्न करत असते. अॅनिमेशन विभागाने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.’ 

धीमंत व्यास यांनी अॅनिमेशन क्षेत्राच्या सद्यस्थितीविषयी मार्गदर्शन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVLCF
Similar Posts
'सूर्यदत्ता'च्या युवराज दळवीचे लॉन टेनिस स्पर्धेत यश पुणे : सोलापूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या १७ वर्षाखालील विभागीय लॉन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजच्या युवराज दळवी याने यश प्राप्त केले. विभागीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी युवराज दळवी याला मिळणार आहे.
‘सूर्यदत्ता’च्या श्रावणी, अनुश्रीला जिम्नॅस्टिक्समध्ये विजेतेपद पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा संकुलाच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये आयोजित केलेल्या १७ वर्षांखालील जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजच्या श्रावणी पेंडसे हिने प्रथम, तर अनुश्री कुलकर्णी हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
‘सूर्यदत्ता’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पुणे : ‘आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो
‘सूर्यदत्ता’च्या सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अॅचिव्हर’ पुरस्कार पुणे : शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘एशिया-अरब समिट अँड अॅवाॅर्ड्स’मध्ये ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अचिव्हर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच संस्थेच्या तीन इन्स्टिट्यूट्सना सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language