Ad will apear here
Next
मुक्तांगण शाळेत रंगली चिमुकल्यांची दहिहंडी
इस्लामपूर (सांगली) : ‘मुक्तांगण प्ले स्कूल’ मध्ये गोकुळाष्टमी निमित्त १२ ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी करण्यात आली. राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी ‘गोविंदा गोपाळा’ म्हणत दहिहंडीच्या थरारक खेळाचा अनुभव घेतला.


इस्लामपूर प्रशासकीय इमारतीच्या परिसरात  मुक्तांगणमध्ये चार वर्षांच्या आतील मुलांसाठी खेळांतून शिक्षण दिले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून, लहानपणापासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. दहीहंडी का व कशी साजरी करतात याची माहिती घेऊन राधा व कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी दहिहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले.  राधांनी टिपऱ्यांचा फेर धरून आनंद साजरा केला तर, बालगोपाल दहिहंडी फोडण्यात चपळाई दाखवत होते. 

‘मुलांच्यातील साहस वाढवणे, एकीचे महत्व पटवून देणे यासाठी दहिहंडीचा उपक्रम राबविण्यात आला. राधा व कृष्ण या व्यक्तीरेखा मुलांना समजावून देण्यात आल्या,’ असे संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी सांगितले.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZNXBF
Similar Posts
चिमुकल्यांनी अनुभवला वारी सोहळा इस्लामपूर (सांगली) :   आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मधील चिमुकल्यांनी एक जुलै रोजी वारी सोहळा अनुभवला. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या या शाळेत, चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते.  पालखी सोहळ्यासाठी या चिमुकल्या वारकऱ्यांनी साडी, धोतर-शर्ट असा वेश परिधान केला होता
मातीचे बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक इस्लामपूर (सांगली) : बेंदूर सणाच्या निमित्ताने येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मध्ये मुलांना मातीपासून बैल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चार वर्षांच्या आतील मुलांसाठी खेळातून शिक्षण दिले जाते. शनिवारी बेंदूर असल्याने या सणाची माहिती देण्यात आली
मुक्तांगण निर्माण करतेय इस्लामपूरची वेगळी ओळख इस्लामपूर (सांगली) : येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’ला माजी ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे व आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली. ‘बालशिक्षणाच्या चळवळीत सहज शिक्षण देताना " ‘मुक्तांगण’ इस्लामपूर शहराची वेगळी ओळख निर्माण करत आहे,’ असे मत अण्णा डांगे यांनी व्यक्त केले. इस्लामपुरात गेल्या सहा वर्षांपासून
वर्धापनदिनानिमित्त नवीन इमारतीचे उद्घाटन इस्लामपूर : आधार हेल्थ केअर सर्व्हिस सेंटरने वर्षभर केलेल्या आरोग्यसेवेची वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्ताने सेंटरच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शुभमुहूर्तावर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language