Ad will apear here
Next
स्वातंत्र्यदेवीची विनवणी : कुसुमाग्रजांची कविता - अभिवाचन - डॉ. प्रतिमा जगताप

‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यावर लिहिलेली कविता. त्यांनी वर्णन केलेल्या परिस्थितीत आजही फारसा बदल झालेला नसल्याने या विनवणीची आजही खूप गरज आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे पुणे आकाशवाणीच्या निवृत्त वरिष्ठ निवेदिका डॉ. प्रतिमा जगताप यांनी...
........
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज
पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥
- कुसुमाग्रज 

(कुसुमाग्रजांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/fp3o2p येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZNOCJ
Bhavana Vispute खूप छान काव्यवाचन प्रतिमाताई.. कुसुमाग्रजांची ही कविता तर ७० ची उमर गाठली तरी औचित्यपूर्णच .. ती तशीच राहू नये एवढीच इच्छा !
Similar Posts
कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ ‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
कणा... कुसुमाग्रजांच्या कवितेचा विविध बोलीभाषांत अनुवाद ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘विठ्ठल’ या कवितेचा मराठीच्या विविध बोलींमधला अनुवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे आता आणखी एक ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविताही व्हायरल झाली आहे, ती तिच्या विविध बोलींमधल्या अनुवादासह... ती कविता आणि अनुवाद येथे देत आहोत
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language