Ad will apear here
Next
पालघरमध्ये योगदिनी विविध उपक्रम

पालघर : योगसाधना हे भारताने जगाला आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी दिलेले एक मोठे वरदान आहे. योग ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक साधना असून, यामुळे मानवी जीवन समृद्ध होऊन शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. भारतातील पाच हजार वर्षे  जुन्या असलेल्या या साधनेला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. कारण तीन वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांतर्फे २१ जून हा ‘आंतराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.

रोग निवारणाच्या या साधनेचा हा विशेष दिवस पालघर जिल्हा परिषदेमार्फत सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये योगाच्या प्रात्यक्षिकांचे  कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी व उघड्यावर शौचविधी करणाऱ्या प्रवृत्ती संपवून पालघर जिल्हा संपूर्ण हागणदारी मुक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता मतदान घेण्यात आले.  

आंतरराष्ट्रीय योगदिन व स्वच्छता मतदानाच्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सुरेखा थेतले यांनी नवली प्राथमिक शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले. योगसाधनेचे आचरण आपल्या दैनंदिन जीवनात करून आपल्या शाळेला, कुटुंबाला, जिल्ह्याला आणि देशाला विवध क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त करून द्यावा, अशा शुभेच्छा या वेळी अध्यक्षांनी विद्यार्थिनींना दिल्या. त्यांनी मुलांसोबत स्वतः योगासने केली व स्वच्छता मतदान प्रक्रियेची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी या वेळी पालघर जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा क्र. एकला भेट देऊन विद्यार्थ्यांबरोबर योगाभ्यास केला. ‘योग केवळ व्यायाम नाही, तर मेंदू आणि शरीर यांना एकत्र जोडणारा दुवा आहे. निसर्ग आणि मानवी जीवन यामधील सामंजस्य आहे,’ असे मत त्यांनी या वेळी मांडले. 

या उपक्रमांतर्गत टी. ओ. चव्हाण (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद पालघर) यांनी खुपरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत योगदिन साजरा केला. तसेच ‘स्वच्छता मतदान’ उपक्रमाची पाहणी केली. या कार्यक्रमाला अश्विनी शेळके (सदस्या, पंचायत समिती, वाडा), श्री. जाधव (विस्तार अधिकारी - ग्रामपंचायत), शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ व ग्रामसेवक उपस्थित होते. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवॠषी यांनी ‘दुर्वेश’ येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन योगदिन साजरा केला. 

या वेळी जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी व पालघर पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये योगसाधनेविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवॠषी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय पतंगे,  जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोह) नंदिनी घानेकर, कार्यकारी अभियंता संजीव धुमाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. व. बा.) राजेंद्र पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, गटविकास अधिकारी (पंचायत समिती पालघर) डी. वाय जाधव, विलास पिंपळे, गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना योग आणि आहारविषयक माहिती देऊन योगोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल मोरे यांनी मार्गदर्शन केले. पालघर जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी ही माहिती दिली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VYZYBD
Similar Posts
शाळांमध्ये स्वच्छताविषयक मतदान पालघर : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्यासाठी व उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती संपवून पालघर जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याकरिता जिल्ह्यात ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षी शाळा सुरू
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत पालघर : समाजातील जातिभेद व असमानतेची दरी दूर करून समाज एकसंध व्हावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत ६३ जोडप्यांना ५० हजार रुपयांचा धनादेश पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाला जिल्हा
पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पालघर : पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १२ जून २०१७ रोजी अध्यक्षा श्रीमती सुरेखा थेतले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. सर्व समित्यांचे सभापती, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन. के. जेजुरकर, तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख या वेळी उपस्थित होते
रूपाली वरठा या मुलीला तन्वी धनवा योजनेंतर्गत अर्थसाह्य पालघर : रूपाली वरठा या मुलीला तन्वी धनवा या योजनेच्या माध्यमातून नुकतेच अर्थसाह्य करण्यात आले. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत ही मदत सुपूर्द करण्यात आली. जनसंपर्क अधिकारी मनीषा निरभवणे यांनी ही माहिती दिली. रूपाली वरठा या नऊ वर्षांच्या मुलीला जिवंत वीजवाहिनीचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language