Ad will apear here
Next
रोवेट मोबिलिटीतर्फे इलेक्ट्रिक दुचाकींची नवी श्रेणी दाखल
चार स्कूटर्स आणि एक बाईक सादर
रोवेट मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक स्कुटर्स व बाईक्सचे  उद्घाटन करताना शांतीलाल मुथा, विठ्ठल मणियार, भरत देसरडा यांच्यासह कंपनीचे संचालक राहुल नहाटा, विजय नहाटा, प्रतीकराज पवार, आदी.

पुणे : रोवेट मोबिलिटीतर्फे बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक स्कूटर्स व बाईक्सची नवीन श्रेणी दाखल करण्यात आली आहे. प्रसिध्द उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा, विठ्ठल मणियार व भरत देसरडा यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन श्रेणीचे नुकतेच पुण्यात एका शानदार समारंभात अनावरण करण्यात आले. या वेळी  रोवेट मोबिलिटीचे संचालक राहुल नहाटा, विजय नहाटा, प्रतीकराज पवार, जितू लोढा व रोहन नहाटा उपस्थित होते. या नवीन इलेक्ट्रिक दुचाकींच्या श्रेणीमध्ये इलेक, वेगाट्रॉन, झिपॉप आणि रामे या स्कूटर्स व ट्रोनो या बाईकचा समावेश आहे.

रोवेट मोबिलिटीचे संचालक राहुल नहाटा म्हणाले, ‘ही एक स्टार्टअप कंपनी असून, भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. स्थानिक व राज्य पातळीवरच्या नवीन पिढीच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तसेच वाहन उद्योगातील नवीन कल लक्षात घेऊन आम्ही ही नवीन श्रेणी सादर केली आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘या दुचाकी एक जानेवारी २०२०पासून रस्त्यावर धावताना दिसतील. त्यांची किंमत ५१ हजार ते एक लाख ५५ हजार रुपयांदरम्यान आहे. लिथियम, अॅसिड आणि पेटंटेड अशा क्लिक प्रकाराच्या बॅटरींच्या पर्यायासह या दुचाकी उपलब्ध आहेत. एंट्री लेव्हल मॉडेल असलेल्या झिपॉकचा कमाल वेग हा २५ किमी असून, इतर स्कूटर्ससाठी ताशी ७५ किमी आहे. ट्रोनो या बाईकसाठी कमाल वेग हा ताशी १०० किमी आहे. या दुचाकी दोन वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध आहेत. रामे या स्कूटरमध्ये असलेला क्रुझ कंट्रोल पर्याय व रिव्हर्स फंक्शन हे या श्रेणीतील खास वैशिष्ट्य आहे. आमची पहिली शोरूम कोरेगाव पार्क येथे सुरू होणार असून, भारतभर विस्तार करण्याआधी कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, सांगली आणि औरंगाबाद येथे शोरूम्स सुरू करणार आहोत. पहिल्या वर्षात दहा हजार युनिटसची विक्री करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

प्रतीकराज पवार म्हणाले, ‘या नव्या इलेक्ट्रिक दुचाकींचे बुकींग २८ ऑक्टोबरपासून म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झाले आहे. रोवेटतर्फे पुण्यात आणखी सात फ्रँचायझी आणि भारतभरात २०२१ पर्यंत २०० फ्रँचायझी शोरूम सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.’ 

राहुल नहाटा यांनी या ब्रँडच्या कल्पनेमागचा हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले, ‘प्रदूषणाविरूध्द लढयाचे पहिले पाऊल आहे. रोवेटची संकल्पना ही अभिनवता, अद्ययावत डिझाइन आणि उत्पादनाची गुणवत्ता यांचा मेळ आहे. संशोधन व विकासावरदेखील आम्ही लक्ष्य केंद्रित केले आहे.’

जितेंद्र लोढा म्हणाले, ‘आम्ही एक अद्ययावत उत्पादन प्रकल्प सुरू करण्याच्या प्रक्रियेत असून, त्याची क्षमता  दरमहा एक हजार युनिट्सची असेल. २०२१पर्यंत ती दरमहा दहा हजार युनिटसपर्यंत वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल.’







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZZDCG
Similar Posts
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर
राज्यातील पहिला महिला संचालित दुग्ध व्यवसाय मावळमध्ये सुरू मावळ : संपूर्णपणे महिलांनी चालविलेला महाराष्ट्रातील पहिला दुग्ध व्यवसाय पुणे जिह्यातील मावळ तालुक्यात सुरू झाला आहे. टाटा पॉवरच्या सहकार्याने येथील महिलांनी मावळ डेअरी फार्मर सर्व्हिसेस प्रोड्युसर कंपनी स्थापन केली असून, याद्वारे सर्वसामान्य शेतकरी ते कृषी उद्योजिका असा मोठा टप्पा या महिलांनी पार केला आहे
एक लिटर पेट्रोलमध्ये १६० किलोमीटर; पुण्याच्या अथर्वने विकसित केली इलेक्ट्रिक-पेट्रोल हायब्रिड बाइक पुणे : एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल १६० किलोमीटर धावणारी बाइक! विश्वास बसत नाही ना; पण हे खरे आहे. अथर्व राजे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने पेट्रोलची बचत करण्यासाठी जुन्या बाइकवर संशोधन करून ही अनोखी इलेक्ट्रिक पेट्रोल हायब्रिड बाइक विकसित केली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या खर्चात बचत होईल, शिवाय ती पर्यावरणपूरकही असेल, असे त्याचे म्हणणे आहे
भारतात गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक पुणे : ‘भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध दोन्ही देशांच्या प्रगतीला पूरक आहेत. व्यवसाय, शिक्षण, आयटी, संशोधन, आरोग्य, बांधकाम अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी जपानी उद्योजक उत्सुक आहोत. महाराष्ट्रात जपानी कंपन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांसाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language