Ad will apear here
Next
आंतरराष्ट्रीय विशेष ऑलिंपिकसाठी पुण्यातील मनालीची निवड
भारोत्तोलन खेळात करणार भारताचे प्रतिनिधित्व

पुणे : पुण्यातील मनाली शेळके या ‘कामायनी’ संस्थेतील विशेष मुलीने दुबईत होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय विशेष ऑलिंपिक स्पर्धेत  प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर स्थान मिळवले आहे. भारोत्तोलन (पॉवरलिफ्टिंग) या खेळात ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पुण्यातील ‘कामायनी’ या संस्थेत शिकणारी मनाली मनोज शेळके हिच्यात खेळासाठी आवश्यक असणारे जिद्द, चिकाटी, चपळता यांसारखे गुण ओळखून आणि या खेळाला साजेशी असलेली शरीरयष्टी यांमुळे प्रशिक्षकांनी तिला भारोत्तोलनाचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. मनालीच्या आई-वडिलांनीही याबाबत पाठिंबा दिला. त्यामुळे मनालीचे पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षण सुरू झाले. 

मनाली शेळकेआपल्यात असलेल्या चिकाटीच्या जोरावर मनालीने सुरुवातीला अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि चांगली कामगिरी केली. कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय भारोत्तोलन स्पर्धेत ४८ किलो गटात जर्क, स्काँड, बेंच या प्रकारांमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले. पंजाब, झारखंड, दिल्ली येथील स्पर्धांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करून तिने सुवर्णपदक मिळवले. वाढत्या गुणवत्तेबरोबरच मनालीचा आत्मविश्वासही वाढत गेला आणि अखेर तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

विशेष मुलांसाठीच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आजवर महाराष्ट्रातून जाणारी मनाली ही एकमेव मुलगी असून, दुबईत १४ ते २१ मार्चदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विशेष ऑलिंपिक स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

मनालीच्या या निवडीबद्दल सर्वांकडूनच आनंद व्यक्त होत असून, कामायनी संस्थेतर्फे मनाली शेळके आणि तिच्या आई-वडिलांचा नुकताच सत्कार करण्यात आला. मनालीचे वडील मनोज शेळके हे पुणे दूरदर्शनमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

(मनालीच्या, तिच्या प्रशिक्षकांच्या आणि वडिलांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZIBBX
Similar Posts
भोंडला आणि दांडियात रंगले दिव्यांग विद्यार्थी पुणे : पारंपरिक पोशाख घालून मोठ्या उत्साहाने दांडिया खेळणारी, तितक्याच उत्साहाने ‘ऐलमा पैलमा.. , अशी गाणी म्हणत भोंडला खेळणारी दिव्यांग मुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. छान कपडे घालून, नटून-सजून आलेली ही मुले या खेळात अगदी रंगून गेली होती. निमित्त होते लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट व कोथरूडच्या वतीने आयोजित महाभोंडला व दांडिया कार्यक्रमाचे
बालदिनी विशेष मुलांसाठी काँग्रेसतर्फे खास कार्यक्रम पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. टॅटू पेंटिंगसह अन्य वेगवेगळ्या गमतीजमतींचा
डॉ. पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे जीवनगौरव पुरस्कार पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे (एबीएलएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईत आयोजित एका समारंभात डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माती-पाण्याविना शेती; नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांची मुले दुबईला पुणे : माती व पाण्याशिवाय केवळ हवेतील प्राणवायूवर केल्या जाणाऱ्या शेतीचे ‘एरोपोनिक्स’ हे नवीन तंत्रज्ञान अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेने मंगळावर शेती करण्यासाठी विकसित केले आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुण्यात शिकणारी शेतकऱ्यांची पाच मुले दुबईला जात आहेत. गणेश अहेर, सौरभ चौधरी, अबूबाकर शेख, मदिपल्ली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language