Ad will apear here
Next
दी गॉड डिल्यूजन
देवावर श्रद्धा असणारे आस्तिक व देवावर विश्वास नसणारे नास्तिक, असा वाद तर सतत घडत असतो. प्रा. रॉबर्ट रिचर्ड डॉकिन्स यांनी विश्व हे देवाने निर्मिले, या समजुतीचा वैज्ञानिक विरोध करीत निरीश्वरवादाचा पुरस्कार केला आहे. ‘दी गॉड डिल्यूजन’ या पुस्तकातून त्यांनी ही संकल्पना विशद केली आहे. जागरूक करण्याचे काम त्यांनी यातून केले आहे.

देव असण्याचे गृहितक आणि विश्वसंबंधीचे शास्त्रीय गृहीतक यांच्यातील मांडणी, देवाच्या अस्तित्वासंबंधीचे युक्तिवाद, विश्व कसे घडत गेले, याबद्दल डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण, सर्व प्रकारच्या श्रद्धा सारख्या पद्धतीने का उत्पन्न होतात, सज्जनपणासाठी देवाची गरज आहे? समाज व जगासाठी धर्म काय करतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. धर्म व बाल्य यावरही चर्चा केली आहे. धर्मातून काही प्रेरणा मिळते, या दाव्यापेक्षा विश्वाची समज वाढविणे, हीच प्रेरणादायी प्रक्रिया आहे, हे यातून स्पष्ट केले आहे. याचा मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केला आहे.

पुस्तक : दी गॉड डिल्यूजन
लेखक : रिचर्ड डॉकिन्स
अनुवादक : मुग्धा कर्णिक
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पाने : ४४७
किंमत : ५०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZPABZ
Similar Posts
होमो डेअस युवाल नोआ हरारी यांनी ‘सेपियन्स’मधून मानवाची उत्क्रांती सांगत देव, धर्म, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य अशा संकल्पना निर्माण करून त्याने जग कसे काबीज केले, याचे वर्णन केले आहे. युवाल यांनी त्यांचे पुढील पुस्तक ‘होमो डेअस’मधून तिसऱ्या सहस्रकात मानवासमोरील दुष्काळ, साथीचे रोग आणि युद्ध या संकटांची चर्चा
श्रीकृष्ण चरित्र कृष्ण हे नाव समोर आले की, त्याची विविध रूपे आठवतात. बाळकृष्ण, कान्हा, मुरलीधर, वासुदेव, योगेश्वर अशा अनेक नावांमधील त्याचे रूपही वेगळे असते. काही कथांमधून श्रीकृष्णाचे जे रूप रंगविले आहे, त्यापेक्षा तो वेगळा कसा आहे, याचा अभ्यास बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केला. कथांमधील कृष्ण त्यांनी ‘श्रीकृष्ण चरित्र’ वाचकांसमोर सादर केला आहे
सरदार वल्लभभाई पटेल – भारताचा पोलादी पुरुष ‘सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते. सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने तुम्ही एवढे नेभळट बनाल, की अन्यायाशी लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही. व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात,’ असे सरदार वल्लभभाई पटेल म्हणत.
मिस्टर अँड मिसेस जिना मोहंमद आली जिना हे अत्यंत यशस्वी बॅरिस्टर आणि राष्ट्रीय चळवळीतील उगवता देदीप्यमान तारा होते. रुबाबदार जिना यांचे अनेकांना आकर्षण होते. पण कोणालाही फारसे जवळ करीत; मात्र अत्यंत सुंदर व हुशार रट्टी पेटीट हिला पाहिल्यानंतर मात्र त्यांना तिची ओढ लागली. तीही त्यांच्या प्रेमात पडली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language