Ad will apear here
Next
पुणेकरांनी अनुभवले ‘लेणे प्रतिभेचे’
पुणे : अख्ख्या महाराष्ट्रावर गारूड करणारी तीन व्यक्तिमत्त्वे अर्थात संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लेखक पु. ल. देशपांडे. या तीन दिग्गजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ‘संवाद, पुणे,’ संस्कृती प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे ‘लेणे प्रतिभेचे’ या अनोख्या कार्यक्रमाचे नुकतेच पुण्यात आयोजन करण्यात आले होते.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात गीत, संगीत, नृत्य आणि दृक्श्राव्य आविष्काराचा आस्वाद रसिकांनी  घेतला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा कीर्ती शिलेदार, राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष ल. म. कडू यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी ‘संवाद, पुणे’चे प्रमुख सुनील महाजन, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संयोजक सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘लेणे प्रतिभेचे’ या कार्यक्रमाचा प्रारंभ ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ या बाबूजींच्या गीताने झाली. ‘गदिमां’च्या काव्य प्रतिभेची झलक देणाऱ्या ‘प्रभात समयी’ या संत जनाबाई चित्रपटातील गीताने वातावरणात भक्तिरसाची निर्मिती केली. त्यानंतर ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या ‘पुलं’च्या आणि ‘बुगडी माझी सांडली गं’ या ‘गदिमां’च्या लावणीवर ‘पायल वृंद’च्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अनय गाडगीळ यांनी, तर नेपथ्य श्याम भुतकर यांनी केले होते. स्नेहल दामले यांनी  निवेदन केले. अपूर्व द्रविड (तबला), रोहन वनगे (वेस्टर्न रिदम), नीलेश देशपांडे (बासरी), मंदार गोडसे (पेटी) आणि अनय गाडगीळ (सिंथेसायझर) या वादक कलाकारांनी कार्यक्रमाला साथसंगत केली.

( कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत. )

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZLMBQ
Similar Posts
शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त ‘लेणे प्रतिभेचे’ पुणे : मराठी माणसाच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केलेले श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लेखक पु. ल. देशपांडे या त्रिमूर्तीच्या अवीट गोडीच्या गीतांचा आनंद घेण्याची संधी पुणेकरांना ‘लेणे प्रतिभेचे’ या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. बुधवारी, १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजता
वुमन्स आर्टिस्ट ग्रुपतर्फे चित्रशिल्प प्रदर्शन पुणे : महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘वुमन्स आर्टिस्ट ग्रुप’तर्फे चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘यामध्ये पुलं, गदिमा आणि बाबूजी यांची महिला चित्रकारांनी
‘पुलं, गदिमा आणि बाबूजी हे युगनिर्माते’ पुणे : ‘पुलं, गदिमा आणि बाबूजी यांनी महाराष्ट्राच्या मनांवर राज्य केले. आता स्वर्गात देवांच्या समोर त्यांची मैफल चालू असेल, असे युगनिर्माते पुन्हा पृथ्वीतलावर होणे नाही,’ असे गौरवोद्गार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त काढले.
भारतीय विद्या भवनमध्ये रंगणार ‘गान वंदना’ पुणे : ‘ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सोमवारी, दि. पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता, गोल्डन मेमरीज निर्मित ‘गान वंदना’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याद्वारे गदिमा आणि बाबूजी यांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language