Ad will apear here
Next
सहकारी बँकांचा सीईओ - एक आर्य चाणक्य
भारताच्या इतिहासात आर्य चाणक्याचं स्थान मोठं आणि योगदान अभूतपूर्व! त्यानं आपल्या बुद्धीचातुर्यानं आणि त्याच्या विलक्षण नीतिनियमांनुसार मौर्य साम्राज्याचा भारतभर विस्तार केला आणि म्हणून त्याची नीतिसूत्रं ‘चाणक्यनीती’ म्हणून प्रसिद्ध झाली. किरण कर्नाड यांना चाणक्याची नीती आणि गुण अंगी असणारा सहकारी बँकांचा सीईओ अभिप्रेत असल्यानंच त्यांनी त्यांच्या पुस्तकाचं नाव ‘सहकारी बँकांचा सीईओ- एक आर्य चाणक्य’ असं ठेवलंय हे उघड आहे!... त्यांच्या या पुस्तकाचा परिचय...
...................
अर्थशास्त्रीय तत्त्वे कोणती आणि कशी असावीत? ग्राहकहित कसे साधावे? सरकारी पातळीवर, राजकीय पातळीवर, वित्तीय क्षेत्रात आणि एकूण अर्थकारणात बँकेचे स्थान, व्यवहार आणि नाती कशी असावीत? ती कशी जपावीत? समस्या उभ्या ठाकल्या तर त्यांना तोंड कसे द्यावे? काय पद्धतीची रणनीती (बँकेची व्यवहारनीती) असावी, अशा विविध मुद्द्यांवर किरण कर्नाड यांनी ‘सहकारी बँकांचा सीईओ- एक आर्य चाणक्य’ या पुस्तकात विवेचन केलं आहे.

या पुस्तकाचं एकाच वाक्यात वर्णन कर्नाड यांच्याच शब्दांत ‘सीईओसंबंधी जे जे अपेक्षित आहे ते ते सर्व काही’ असं करता येईल! या पुस्तकातल्या पाच भागांतून सीईओ कोण, त्याचं कार्यक्षेत्र, बँकांची धोरणं, संचालक मंडळाचं कार्य वगैरे विस्तृतपणे सांगताना त्यांनी यशस्वी सीईओ होण्याचा गुरुमंत्रही दिला आहे.

पहिल्या भागामध्ये त्यांनी सीईओ हा बँकेचा प्रमुख घटक कसा, त्याची जबाबदारी कोणती, त्याची वागणूक कशी असावी, आचारविचार कसे असावेत, सीईओची निवड कशी होते, कोणते निकष असतात, सीईओच्या कामांची चेकलिस्ट कशी असते, अशा सर्व महत्त्वाच्या बाबींवर सखोल माहिती दिली आहे. 

दुसऱ्या भागात बँकांच्या विकास धोरणात सीईओचे महत्त्व, थकबाकी वसुली, सहकार कायदा, प्रशासकीय कामे, बँकेची कार्यक्षमता, बँकेच्या जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय बैठका, परिषदा यांची तपशीलवार माहिती कर्नाड यांनी दिली आहे.

तिसरा भाग हा धोरणात्मक बाबींवर प्रकाश टाकतो. यात बँकेची एकूणातली धोरणं, केवायसी, अँटीमनी लाँडरिंग, गुंतवणूक आणि कर्मचारी धोरणं यांचं सखोल विवेचन कर्नाड यांनी केलं आहे.
 
चौथा भाग हा बँकेचं संचालक मंडळ आणि विविध सभांच्या पार्श्वभूमीवर सीईओची भूमिका अशा स्वरूपाचा आहे. यात बँकेच्या मासिक सभा, तिमाही सभा, अर्धवार्षिक, वार्षिक सभा, व्यवस्थापनाच्या बैठका आणि तिमाही आढावा, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा यांचा ऊहापोह केला आहे.
 
पाचव्या आणि महत्त्वाच्या भागात कर्नाड यांनी यशस्वी सीईओ होण्याचा गुरुमंत्रच दिला आहे. यासाठी त्यांनी २२ प्रकारचे सोपे आणि रोज करावयाचे उपाय, रोजचे वर्तन कसे असावे यांविषयीच्या टिप्स दिल्या आहेत. त्या अत्यंत उपयोगी तर आहेतच आणि त्या अंगीकारल्यावर यशस्वी सीईओ बनता येईल याची खात्री बाळगायला हरकत नाही.

हे पुस्तक किरण कर्नाड यांनी आपल्यासमोर आणले आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण ते स्वतः अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय सीईओ म्हणून विख्यात आहेत. जवळपास ४२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव तर त्यांच्या गाठीशी आहेच. शिवाय एका साहित्यप्रेमी आणि कलाप्रेमी घराण्याचा वारसा लाभल्यामुळे त्यांच्या लेखणीतून उतरलेलं हे पुस्तक समस्त बँकिंग व्यावसायिकांना आणि त्यात रस असलेल्या सामान्य वाचकांनाही अत्यंत उपयुक्त आणि मोलाचं ठरेल यात शंका नाही.
.....................
संपर्क : किरण कर्नाड
मोबाइल : ९८५०९ ०१११७
प्रकाशक : अंजली प्रकाशन, स्नेहल अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे ४११०४१
मोबाइल : ९८२३१ ७५५३४
ई-मेल : abhijaatllp@gmail.com
पृष्ठे : २४२
मूल्य : ३५० रुपये
...........

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZPABG
Similar Posts
‘सहकारी बँकांचा सीईओ - एक आर्य चाणक्य’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : ‘सहकारी बँकांचा सीईओ – एक आर्य चाणक्य’ या अंजली प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन १९ सप्टेंबर रोजी मुंबईत झाले. किरण कर्नाड यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ‘दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड, मुंबई’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या वेळी
प्रोग्रामिंग इन ‘सी’ ‘प्रोग्रामिंग इन सी फ्रॉम नॉव्हिस टू एक्स्पर्ट’ हे महेश भावे आणि सुनील पाटेकर यांनी लिहिलेलं आटोपशीर, पण ‘सी प्रोग्रामिंग’विषयी सर्व माहिती अत्यंत सुलभतेने देणारं पुस्तक आहे. नवशिक्यांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा या पुस्तकाविषयी...
अंतरंग युवा मनाचे एकीकडे शिक्षण आणि नोकरीचं व्यस्त गणित असताना रोजच्या आयुष्यात युवकांना भेडसावणाऱ्या इतर समस्या म्हणजे ‘जनरेशन गॅप’मुळे उद्भवणारे कलह, प्रेमप्रकरणं आणि त्यातून प्रसंगी वाट्याला येणारं नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे नात्यांमध्ये येत चाललेला दुरावा आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या
परिवर्तन तुमच्याच हाती... देशातील परिस्थितीत परिवर्तन कसे घडायला हवे आणि आपण नागरिक ते कसे घडवून आणू शकतो, हा विचार इंजिनीअर देवेंद्रसिंग वधवा यांनी ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकातून मांडला आहे. त्या पुस्तकाविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language