Ad will apear here
Next
‘रुबी हॉल’तर्फे विद्यार्थी, कर्मचार्‍यांचा सत्कार


पुणे : दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या कर्मचार्‍यांच्या मुला-मुलींचा रुबी हॉल क्लिनिकतर्फे सत्कार करण्यात आला. या अंतर्गत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात २३ विद्यार्थ्यांना कै. डॉ. के. बी. ग्रांट मेरिटोरियस अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले; तसेच शिक्षणात पुन:प्रवेश करत पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या वॉर्डबॉइजसह २६ सहाय्यक कर्मचार्‍यांचा सत्कार ही या वेळी करण्यात आला.

ग्रांट मेडिकल फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, ‘हॉस्पिटलच्या स्थापनेपासूनच माझ्या वडिलांनी सर्वांसाठी शिक्षण हे ध्येय ठेवले होते. त्यांचा हा दृष्टीकोन पुढे नेत शिक्षणाच्या माध्यमातून विकास या तत्त्वज्ञानाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे. याअंतर्गत आम्ही आमच्या सहाय्यक कर्मचार्‍यांसाठी सतत शिक्षण व विकासाशी निगडीत उपक्रम हाती घेत असतो; तसेच डॉक्टर्स व नर्सेससाठी सीएमई चे आयोजन केले जाते. आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की,अनेक सहाय्यक कर्मचार्‍यांनी आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असून, सर्व शिक्षा अभियानाअंर्तगत २६ सहाय्यक कर्मचारी बीए पदवीसाठी शिक्षण घेत आहेत. आम्हाला आशा आहे की, अनेक सहाय्यक कर्मचारी आपले शिक्षण पूर्ण करतील.’

‘रुबी हॉल’चे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख आर. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘आमच्या कर्मचार्‍यांमध्ये विविध विभागांतील डॉक्टरपासून नर्सेसपर्यंत, तसेच सहाय्यक कर्मचार्‍यांचा समावेश असून, हे सर्वजण रुग्णांचा जीव वाचवित आपले अत्यंत व्यस्त वेळापत्रक सांभाळून आपल्या मुलांनी परीक्षेत चांगले गुण मिळवावेत यासाठीही ते प्रोत्साहित करतात. त्यामुळे त्यांच्या मुलांनी चांगले गुण मिळवले, तर त्याचे श्रेय कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांना देखील जाते. या गुणवान मुलांचा सत्कार करतानाच आम्ही त्यांचे पालक असलेल्या आमच्या कर्मचार्‍यांच्या खडतर परिश्रमाला सलाम करत आहोत. आम्हाला आशा आहे की त्यांच्या पालकांनी केलेले प्रयत्न त्यांना आयुष्यात आणखी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देतील.’

‘रुबी हॉल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘पारंपरिक कल्पनांच्या पलीकडे जाऊन पाहिल्यास आपल्या आयुष्यातील सर्व निर्णयांवर शिक्षणाच्या अभ्यासाचा परिणाम होत असतो. वैयक्तिक महत्त्वाकांक्षी व सामाजिक प्रतिष्ठा याबरोबरच वैयक्तिक आयुष्यात उत्कर्ष साधने हे शिक्षणामुळे शक्य होते. सर्व शिक्षा अभियान या उपक्रमाच्या साहाय्याने आम्ही आमच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी सहाय्यक कर्मचार्‍यांना त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन देतो. आपल्या आयुष्याच्या सर्व क्षेत्रावर शिक्षणाचा मोठा परिणाम होत असतो, असा आमचा विश्वास आहे आणि म्हणूनच या आमच्या छोट्याशा प्रयत्नामधून रुबी हॉल परिवारातील प्रत्येक सदस्याला शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करता येतील आणि यशाची गुरुकिल्ली सापडेल असा आमचा विश्वास आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZIKBQ
Similar Posts
‘अवयवदान हे महान कार्य’ पुणे : ‘’​​जिवंतपणे चांगले काम करू शकलो नाही, तरी मरताना किती मोठे कार्य करण्याची शक्यता असते हे अवयवदानामुळे सिद्ध होते’,​​ असे मत प्रसिध्द अभिनेते अतुल परचुरे यांनी व्यक्त केले.
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे कॅन्सर मॅनेजमेंट कोर्स पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे प्राथमिक देखभाल चिकित्सकांसाठी (प्रायमरी केअर फिजियन्स) १३व्या कॅन्सर मॅनेजमेंट शॉर्ट सर्टिफिकेट कोर्सचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
‘रुबी’तर्फे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जनजागृती पुणे : ‘जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त (वर्ल्ड नो टोबॅको डे) ३१ मे रोजी रूबी हॉल क्लिनिकतर्फे जनजागृतीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत,’ अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, कर्करोग तज्ञ डॉ. भूषण झाडे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ठाणेकर यांनी दिली.
‘रुबी’तर्फे वर्षभरात १३ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पुणे : रक्तसंचयामुळे हृदय निकामी होण्यातून (कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर) अनेकांचे आयुष्य बाधित होते. शस्त्रक्रियात्मक आणि जीवनशैली उपचारांतील आधुनिक औषधांमुळे त्यांना आनंदी आयुष्य जगता येते; पण काही लोकांबाबत मात्र परिस्थिती तीव्र खालावते. त्यावेळी ते अशा टप्प्यावर पोचतात जेथे हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language