
थोरामोठ्यांच्या चरित्रांची आणि आत्मचरित्रांची पुस्तके बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून हवी ती माहिती क्षणार्धात प्राप्त होऊ शकते; मात्र, त्या माहितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीचा नेमका आणि अचूक संदर्भ प्राप्त व्हावा, या उद्देशाने डॉ. कैलास कमोद यांनी लिहिलेले ‘वन मिनिट बायोग्राफी’ हे पुस्तक उपयुक्त ठरते. वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकाचे दोन भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे.
पहिल्या भागामध्ये देशाचे आतापर्यंत होऊन गेलेले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील नेते, समाजसुधारक, संपादक, साहित्यिक यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या भागामध्ये भारतरत्न, नोबेलविजेते भारतीय, लष्करी अधिकारी, वैज्ञानिक, गिर्यारोहक, उद्योगपती, चित्रकार, कलावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू आणि कुस्तीगीरांचा समावेश आहे. लहान मुलांना भेट देण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
प्रकाशक : वैशाली प्रकाशन
पाने : ३९२
किंमत : ३५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)