Ad will apear here
Next
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी
दिवाळीच्या उत्साहाने बाजारपेठ गजबजली

पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. ‘धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या लग्नसराईच्या काळासाठीही ही चांगली सुरुवात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीला दागिन्यांच्या  विक्रीत पाच ते दहा टक्के वाढ झाली. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेच्या निमित्तानेही दागिने खरेदीत आणखी वाढ होईल,’ असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.  

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ
ते म्हणाले, ‘दसऱ्यापासून संपूर्ण महिन्याचा विचार केला, तर दागिने खरेदीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या आसपास आहे. या उत्सवकाळात दागिने खरेदी अशीच सुरू राहील, अशी आशा आहे. दिवाळीच्या काळात ग्राहक नेकलेस, बांगड्या, साखळ्या अशा दागिन्यांना पसंती देतात. कॉर्पोरेट व उद्योग क्षेत्रात भेटवस्तू म्हणून चांदीचे दागिने व वस्तूंना अधिक पसंती आहे. या वर्षी पुरूषांच्या प्लॅटिनम ज्वेलरी खरेदीकडेदेखील कल वाढल्याचे दिसत आहे, त्यामध्ये ब्रेसलेट व अंगठ्यांचा समावेश आहे.’

‘चीन आणि अमेरिकेतील व्यापारातील तणाव कमी झाल्याने; तसेच ब्रेक्झिटचा निर्णय पुढे गेल्याने सोन्याच्या भावात काही प्रमाणात स्थिरता आली आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर झाला असून, ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे,’ असेही गाडगीळ यांनी नमूद केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZSWCF
Similar Posts
पीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू पुणे : शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे नवीन दालने सुरू केली आहेत.
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
पोलीस बांधवांसमवेत दीपोत्सव पुणे : आपल्याला सण, उत्सव आनंदात साजरे करता यावेत, यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, स्वछता कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांना दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी वंदेमातरम् संघटनेचे युवा वाद्य पथक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव साजरा करण्यात आला
...आणि ‘त्यांच्या’ही डोळ्यांत उजळली दिवाळी! पुणे : सुंदरसा पाट, रांगोळ्यांचा थाट, सुगंधी तेल-उटण्याचा सुवास, औक्षणाचे ताट, नव्या कपड्यांचा साज आणि गोडाचा घास यामुळे ‘त्यांच्या’ डोळ्यांत दिवाळीच्या लाख लाख दीपांचे तेज झळकत होते. चेहरे आनंदाने फुलबाज्यांसारखे खुलले होते.. हे दृश्य होते नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या अनोख्या दिवाळीचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language