Ad will apear here
Next
... अशा लागतात सवयी!
आपण जे करतो, त्याचे सवयीत रूपांतर कसे होते, सवयीत चांगले बदल कसे घडवून आणायचे, यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी कशा उपयुक्त ठरतात, आदींबद्दलचे मार्गदर्शन चार्ल्स डुहीग यांनी ‘द पॉवर ऑफ हॅबिट’ या पुस्तकातून केले आहे. मोहन गोखले यांनी त्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे. सवयी कशा लागतात आणि त्यांचे कार्य कसे चालते, याबद्दलचे त्या पुस्तकातील प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
.........
शास्त्रज्ञांच्या मते, सवयी निर्माण होतात. कारण आपला मेंदू सतत ऊर्जा, श्रम वाचवण्याचे मार्ग शोधत असतो. मेंदूला जर त्याचे काम करण्याची मोकळीक दिली, तर आपल्या रोजच्या जीवनातील जवळजवळ सगळ्याच गोष्टींचे सवयींमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न तो करेल. कारण सवयींमुळे आपल्या मेंदूला वारंवार विश्रांत होण्याची संधी मिळते. श्रम वाचवण्याचे हे नैसर्गिक ज्ञान अत्यंत उपयुक्त आणि फायद्याचे आहे. कार्यक्षम मेंदूला कमी जागा लागते, ज्याच्यासाठी आपोआपच डोक्याचा आकार लहान असला तरी चालते. त्यामुळेच प्रसूती सोपी होते आणि आपोआपच बाळांच्या आणि मातांच्या मृत्यूची संख्या कमी होते. 

कार्यक्षम मेंदूमुळे चालणे, खाण्याचा पदार्थ निवडणे यांसारख्या अगदी प्राथमिक गोष्टींसाठी आपल्याला सतत विचार करण्याची गरज भासत नाही. म्हणून आपण आपली बौद्धिक ऊर्जा, क्षमता काळाप्रमाणे भाल्यांसारखी शस्त्रे, सिंचन पद्धती, विमाने आणि व्हिडिओ गेम्स यांसारखे शोध लावण्यावर केंद्रित करू शकतो.

परंतु आपल्या मेंदूची काम वाचवण्याची ही पद्धत आपल्याला अडचणीतसुद्धा टाकू शकते. कारण चुकीच्या क्षणी आपल्या मेंदूची सतर्कता कमी झाली, तर आपल्याला झुडपामध्ये लपून राहिलेले श्वापद किंवा दुसऱ्या बाजूने वेगाने येणारी कार इत्यादींसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव वेळीच होत नाही. म्हणून आपल्या बेसल गँग्लियाने सवयींना कधी ताबा घेऊ द्यायचा, याबाबत मोठ्या हुशारीने एक प्रणाली विकसित केली आहे. जेव्हा आपल्या वागणुकीतील नित्य कृती सुरू होते किंवा संपते, तेव्हा हे घडते.

हे कार्य कसे चालते, हे समजण्यासाठी उंदराच्या न्यूरॉलॉजिकल सवयीच्या आकृतीकडे काळजीपूर्वक बघावे लागेल. त्या सापळ्याच्या सुरुवातीला उंदराला ‘क्लिक’ असा आवाज आल्यावर, मधील विभाजक सरकण्याआधी, त्याच्या मेंदूतील हालचालीला वेग येतो आणि पुन्हा अगदी शेवटी, जेव्हा त्याला चॉकलेट सापडते, तेव्हा त्याच्या मेंदूतील हालचालीला वेग आलेला दिसतो.

सवयीकडे कधी नियंत्रण सोपवायचं आणि कोणत्या सवयीचा उपयोग करायचा, हे या आकृतीतील रेषांवरून मेंदू कशा प्रकारे ठरवतो ते दिसून येते. उदा. त्या विभाजकाच्या मागे असलेल्या उंदराला, तो ओळखीच्या सापळ्यात आहे, की बाहेर मांजर दबा धरून बसलेल्या अनोळखी कपाटात आहे, हे कळणे अवघड आहे. अशा अनिश्चिततेच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी, सवयीचे कार्य सुरू होण्याआधी, मेंदू काही ओळखीच्या खुणा शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. विभाजकाच्या पलीकडून ‘क्लिक’ आवाज आल्यावर उंदराला माहीत होते, की सापळ्याच्या सवयीचा उपयोग करायचा आहे. परंतु जर त्याला ‘म्याव’ असा आवाज ऐकू आला, तर त्याने वेगळा मार्ग निवडायचा आहे, हे त्याला समजते. या सगळ्या कृतीच्या शेवटी जेव्हा त्याला चॉकलेट दिसते, तेव्हा मेंदू पुन्हा पूर्णपणे जागृत होतो आणि सर्व ठरल्याप्रमाणे झाले आहे याची खात्री करून घेतो.

आपल्या मेंदूतील ही प्रक्रिया म्हणजे तीन टप्प्यांची साखळी आहे. पहिला टप्पा म्हणजे मेंदूला मिळणारी सूचना (Cue) जी मेंदूला जागृत करते, कोणत्या सवयीचा उपयोग करायचा आहे याचे मार्गदर्शन करते. दुसरा टप्पा म्हणजे आपली नित्य कृती (Routine) जी शारीरिक, भावनिक किंवा बौद्धिक असू शकते. आणि तिसरा टप्पा म्हणजे बक्षीस (Reward), जे मेंदूला ही साखळी भविष्यकाळामध्ये लक्षात ठेवण्याच्या योग्यतेची आहे की नाही, हे ठरवण्यास मदत करते.

(चार्ल्स डुहीग यांनी लिहिलेले आणि मोहन गोखले यांनी मराठीत अनुवादित केलेले ‘द पॉवर ऑफ हॅबिट’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZJLCH
Similar Posts
प्राणायाम शिकताय? मग हे नक्की वाचा! डॉ. गिरीधर करजगावकर यांनी ‘प्राणायाम – ज्ञान व विज्ञान’ हे प्राणायामाबद्दल सखोल माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग मार्ग आहे. प्राणायामाचे ज्ञान मिळवत असताना या अष्टांग मार्गाचे मूलभूत ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. त्यापैकी ‘यम’ या मार्गाची
शिवाजी – द मॅनेजमेंट गुरू : भाग एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास युद्धकौशल्य, राजकारण अशा वेगवेगळ्या अंगांनी केला जातो. प्रा. नामदेवराव जाधव यांनी महाराजांचा अभ्यास ‘शिवाजी - द मॅनेजमेंट गुरू’ या पुस्तकातून वाचकांसमोर मांडला आहे. या पुस्तकात व्यवस्थापनाची मूळ तत्त्वे आणि शिवाजी महाराजांचे चरित्र यांची छान सांगड या पुस्तकात घातलेली आहे
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language