
मधुमेह म्हणजे डायबेटीस हा आजार अन्य व्याधींचे कारण बनू शकतो, हे आता माहित झाले आहेच म्हणूनच या आजाराची लागण झाली की त्यावर आयुष्यभर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा मधुमेहासंदर्भात डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुड बाय डायबेटिस’मधून जागृती केली आहे.
मधुमेह म्हणजे काय, तो कसा होतो, मधुमेह कोणाला होऊ शकतो, त्याची लक्षणे, दुष्परिणाम, अवयवांना जाणविणारा धोका, मधुमेहातील बेशुद्धावस्था, मधुमेहाचे प्रकार, त्यावरील औषधोपचार, आहार व व्यायामाचे प्रकार, इन्सुलिनचे महत्त्व, इंजेक्शन घेण्याची पद्धत, नियमित तपासणी, पायांची निगा, मेधुमेही स्त्री व गर्भधारणा याविषयी शास्त्रीय माहिती लेखकाने दिली आहे.
मधुमेहासंबंधी गैरसमज व त्यावरील उत्तरे, आहाराविषयी माहिती व त्याचे तक्ते, इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांसाठी दैनंदिन आहार, मधुमेहींसाठी खास रेसिपी यात दिल्या आहेत. मानसिक व सामाजिक दृष्टीकोनातून मधुमेह यावर प्रकाश टाकताना मधुमेह्यांना जाणवणाऱ्या समस्या उदा. आर्थिक प्रश्न, विवाह, वाहन चालविणे, प्रवास, रक्तदान, उपवास आदींवर मार्गदर्शन केले आहे. डॉक्टरांनी वैद्यकीय दृष्टीकोनातून हे मार्गदर्शन केले आहेच शिवाय ते स्वानुभवावर आधारित आहे.
प्रकाशक : वैशाली प्रकाशन
पाने : १६८
किंमत : १५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)