Ad will apear here
Next
जरा येऊ का मनात!
सध्याचे जग गॅजेटचे आहे. कोणतीही गोष्ट हवी असल्यास आपण ती हातातील मोबाइल किंवा संगणकावर इंटरनेटचा वापर करून घरबसल्या मिळवू शकता. सोशल मीडियाच्या आभासी जगात वावरताना प्रत्यक्षातील नाती, हाडामांसाची माणसे यातील संवाद खुरटत चालला आहे. ही अवस्था कुमुदिनी भार्गव यांनी जाणून ‘जरा येऊ का मनात!’ या पुस्तकातून दाखवून त्याची कारणमीमांसा केली आहे व मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. भोवताली घडणाऱ्या प्रसंगाचा संदर्भ घेऊन लेखिकेने मनातील भाव, विचारांचे मंथन शब्दांमधून व्यक्त केले आहे. मानवी जीवनाचा आधार असलेल्या श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले, की लोक काय काय करतात, याची उदाहरणे यात आहेत. दररोज ज्यांच्याशी संबंध येतो, अशा ज्ञात-अज्ञात व्यक्ती, काम-काळ-वेग यांचे संतुलन राखणे, आरोग्याचा मूलमंत्र असलेली स्वच्छतेची सवय अंगी बाणवणे, तारतम्य पाहून वागणे-बोलणे, घरकाम करणाऱ्या मावश्यांशी मैत्रीचे बंध जोडणे, सशक्त मानसिकता आणि महिलांचा उत्कर्ष, महिलांची जबाबदारी आदी विषयांवर लेखिकेने मनोगत व्यक्त केले आहे. तसेच, लव्ह इन रिलेशनशिप, खरी दानत, अन्न हे पूर्णब्रह्म, संवेदनशीलता अशा अनेक गोष्टींवर एकूण ४४ लेख या पुस्तकात आहेत.

पुस्तक : जरा येऊ का मनात!
लेखिका : कुमुदिनी भार्गव
प्रकाशन : निर्मल प्रकाशन
पृष्ठे : १६८
मूल्य : २०० रुपये

(‘जरा येऊ का मनात!’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZZPCC
Similar Posts
चला नाती जपूया... रक्ताचे नाते हे जन्मतःच तयार होते; मात्र आयुष्यात अशी अनेक नाती असतात जी नकळत निर्माण होतात. रक्ताच्या नातेसंबंधातही मैत्रीचे, विश्वासाचे नाते असेल, तर ते जास्त दृढ होते. नात्याचे हे भावबंध जपणे आजच्या ‘मी व माझे कुटुंब’ या पलीकडे न पाहण्याची दृष्टी असलेल्या जगात खूप महत्त्वाचे असल्याचे कुमुदिनी भार्गव यांच्या ‘चला नाती जपूया
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून
श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील उपनिषद आहे. अनेक जण ते नेहमी म्हणतात, त्याची आवर्तनेही करतात; मात्र त्यातील अनेक शब्दांचा अर्थ लक्षात येतोच असे नाही. म्हणूनच स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांनी ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार’ या पुस्तकात गणपती अथर्वशीर्षाचे सूक्ष्म-अर्थविवरण केले आहे. कथा, नाममंत्र

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language