Ad will apear here
Next
‘स्वत:मधील न्यूनगंड बाजूला ठेवणे हीच खरी गरज’
अरविंद इनामदार यांचे मत
अरविंद इनामदार यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करताना (डावीकडून) महादेव जानकर, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, अंकित काणे, अभिनेते स्वप्नील जोशी व पूजा सहस्त्रबुद्धे.
पुणे : ‘स्वत:मध्ये असलेला न्यूनगंड बाजूला ठेवून स्वत:ला सिद्ध करणे हीच खरी गरज आहे. उभ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांनादेखील स्वत:ला सिद्ध करावे लागले होते. त्यामुळे स्वत:ला कधीही कमी न लेखता सातत्याने प्रयत्न करा, तर उद्याचा दिवस नक्कीच तुमचा आहे’, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केले.

ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अभिनेता स्वप्नील जोशी व आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे यांना ‘युवा गौरव’ पुरस्काराने,  पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना ‘समाजमित्र’ पुरस्काराने तर, भालचंद्र कुलकर्णी यांना ‘ब्राह्मण जागृती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी अतुलशास्त्री भगरे गुरुजी, संघटनेचे अध्यक्ष अंकित काणे, सचिव योगेश अत्रे, रोहन जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अतुल अवचट आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना अभिनेते स्वप्नील जोशी म्हणाले, ‘आम्ही जरी चित्रपटामध्ये हिरो असलो तरी आमचे माय-बाप रसिक प्रेक्षकच आहेत. आपल्यासारख्या रसिकांमुळेच आज मराठी चित्रपटांना चांगले दिवस दिसत आहेत. ही एका दिवसात घडलेली किमया नसून, आपल्यासारख्या पाठीराख्यांमुळेच हे शक्य झाले आहे.’

या वेळी बोलताना आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘कला आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. केवळ आपला या क्षेत्रांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे.     
  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी, प्रास्ताविक अंकित काणे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश अत्रे यांनी केले.

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना समाजमित्र पुरस्काराने सन्मानित करताना अरविंद इनामदार, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, अंकित काणे, अभिनेता स्वप्नील जोशी.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZWBBT
Similar Posts
‘मराठी चित्रपटसृष्टी व कलाकारांना सुगीचे दिवस’ पुणे : ‘सध्या मराठी चित्रपटसृष्टी चांगल्या संक्रमणातून चालली असून,यामुळे मराठी कलाकारांनाही सुगीचे दिवस आले आहेत.कलाकारानेही रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाला प्रामाणिकपणे जागून, त्यास आपल्या अभिनयाने प्रेमाचीच पावती देणे क्रमप्राप्त आहे’,असे मत मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी याने व्यक्त केले
अनिल शिरोळे यांना ‘एथिकल पॉलिटीशियन’ पुरस्कार पुणे : ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांचा ‘द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी-एथिकल पॉलिटीशियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
गोखले, दाढे यांचा उद्या गौरव पुणे : ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम चालवणाऱ्या वीणा गोखले आणि भगिनी निवेदिता बँकेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षी दाढे यांना उद्या, २६ मार्च रोजी स्नेहाधार गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पीडित व अत्याचारित महिलांना दिलासा देण्याचे काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेच्या स्नेहाधार या पुण्यातील प्रकल्पाच्या
अवनिका कृतज्ञता पुरस्काराने गौरव पुणे : इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात पर्यावरणदिनी झालेल्या कार्यक्रमात ‘टेलस ऑर्गनायझेशन’चे लोकेश बापट यांना अवनिका कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. फोटोग्राफी सायकल क्लब संस्थेच्या वतीने पाच जून रोजी या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाड येथील सागर मिस्त्री या पर्यावरण क्षेत्रातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language