Ad will apear here
Next
फक्त अडीच हजारांत ‘उडान’
नवी दिल्ली : ‘उडान’ या योजनेअंतर्गत देशात तासाभराचा विमान प्रवास केवळ अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकांना विमानप्रवास अनुभवता यावा यासाठी ‘उडे देश का आम नागरिक’ ऊर्फ ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, जळगाव, नांदेड या प्रमुख शहरांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते हैदराबाद या सेवा जूनपासून सुरू होणार आहेत. इतर शहरांना सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गणपती राजू आणि राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ‘उडान’ योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणि पहिल्या बोलीमध्ये निवड झालेल्या पाच विमान कंपन्यांची आणि त्यांच्या १२८ मार्गांची घोषणा केली. या योजनेमध्ये देशातील कमी वापर झालेल्या आणि पडून असलेल्या विमानतळांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली-सिमला, आग्रा-जयपूर, चेन्नई- म्हैसूर, अहमदाबाद-मुंद्रा अशा प्रमुख मार्गांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. सध्या विमान कंपन्यांचे दर मागणीनुसार कमी-अधिक होत असतात. त्यामुळे ते अनेकदा सामन्यांच्या आवाक्याबाहेर जातात. छोट्या शहरांमधून प्रवासीसंख्या भरत नसल्याने ते विमान कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. या पार्श्वभूमीवर ‘उडान’ ही योजना आखण्यात आली आहे.

प्रायोगिक तत्त्वावर सध्या २१ महिन्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या काळात मिळणारा प्रतिसाद पाहून ही सेवा त्या त्या शहरात चालू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ७० ते ९० आसनी विमानातील साधारण ५० आसने २५०० रुपये प्रति तिकीट या दराने प्रवाशांना देण्यात येतील व उरलेल्या आसनांसाठी प्रवाशांना नेहमीचे दर लागू असतील. म्हणजे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DYULBA
Similar Posts
नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा नाशिक : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातर्फे शनिवारी, २७ मे रोजी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील नितीन देशमुख, तसेच अरुण सोनवणे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,
व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळा नाशिक : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कोल्हापूरचे संजय हळदीकर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाविषयी
‘शाळा सिद्धी’ उपक्रमात पुणे अव्वल मुंबई : केंद्र सरकारच्या ‘ शाळा सिद्धी ’ या उपक्रमांतर्गत राज्यातील केवळ नऊ हजार शाळा ‘अ’ श्रेणीस पात्र ठरल्या असून, पुणे विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अव्वल शाळांना मानांकन देण्याचा हा उपक्रम प्रथमच हाती घेतला आहे. या उपक्रमात पुणे विभाग पहिल्या स्थानावर असून, कोकण विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे
महाराष्ट्रातील तरुण देशपातळीवर झळकले; नवलिहाळकर, मालपुरे यांना राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली : कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनीत मालपुरे या तरुणांना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते नुकतेच राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर येथील इको-प्रो बहुद्देशीय संस्थेचाही या वेळी सन्मान करण्यात आला. केंद्रीय युवा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language