Ad will apear here
Next
पीएनजी ज्वेलर्सचे पिंपळे सौदागरमध्ये दुसरे फ्रँचायझी स्टोअर
करिष्मा कपूरच्या हस्ते उद्घाटन
‘पीएनजी ज्वेलर्स’च्या पिंपळे सौदागर येथील दुसऱ्या फ्रँचायझी स्टोअरचे उद्घाटन अभिनेत्री करिष्मा कपूरच्या हस्ते झाले.

पुणे : औंधमधील पहिल्या फ्रँचायजी स्टोअरच्या यशानंतर अवघ्या १५ दिवसातच ‘पीएनजी ज्वेलर्स’ने पिंपळे सौदागर येथे दुसरे फ्रँचायझी स्टोअर सुरू केले आहे. या स्टोअरचे उद्घाटन अभिनेत्री करिष्मा कपूर ह्यांच्या हस्ते झाले. या फ्रँचायझी स्टोअरमध्ये आजच्या काळातील महिलांसाठी क्लासिक, तसेच समकालीन डिझाईनचे दागिने उपलब्ध आहेत. हे स्टोअर पिंपळे सौदागर येथील शिवार चौक या मध्यवर्ती ठिकाणी आहे. 

या स्टोअरचे स्वरूप पीएनजी ज्वेलर्सच्या इतर स्टोअर्सप्रमाणेच असून, ब्रँडचा उच्च गुणवत्ता व मानकांचा वारसा पुढे नेईल. प्रत्येक फ्रँचायझी स्टोअरमध्ये पीएनजी ज्वेलर्सतर्फे एक व्यवस्थापक उपलब्ध असणार आहे. 


या वेळी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘आमच्या औंध येथील पहिल्या फ्रँचायझी स्टोअरच्या यशाने आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. ग्राहकांना खरेदीचा सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न पीएनजी नेहमीच करत आले आहे. आम्हाला केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनदेखील फ्रँचायझी स्टोअरसाठी मागणी येत आहे. याच प्रकारे प्रतिसाद मिळत राहिला, तर पुढील दोन वर्षात २० स्टोअर्स सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आम्ही सहजरित्या पार करू शकू. पुण्यातील दुसरे फ्रँचायझी स्टोअर हे आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, ते  पीएनजी ज्वेलर्ससाठी या शहराचे महत्व अधोरेखित करते.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZHXBT
Similar Posts
पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर पुणे : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर सादर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना हिऱ्यांचे दागिने एक लाख १९ हजार रुपयांपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. ही ऑफर
पीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर पुणे : भारतातील सर्वांत विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी क्षेत्रामध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आपले पहिले फ्रँचायजी स्टोअर औंध येथे सुरू केले आहे. याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले.
दाजीकाका गाडगीळ करंडक एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर पुणे : ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ११ ते २१ सप्टेंबरदरम्यान विविध शहरांत होणार असून, अंतिम फेरी २५, २६ सप्टेंबरला पुण्यात होणार आहे. पुण्यात तीन ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली
‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन पिंपळे सौदागरमध्ये पुणे : गेल्या १४० वर्षाची परंपरा असलेल्या ‘रांका ज्वेलर्स’चे अकरावे दालन आता पिंपळे सौदागर येथे सुरू होत आहे. कोकणे चौक येथील ‘भूमी अलीयम’ या इमारतीत असलेल्या या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी, ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language