Ad will apear here
Next
रामानंद सागरांचं ‘रामायण’ मराठीतून पाहता येणार... ११ जूनपासून!


मुंबई :
रामानंद सागरनिर्मित ‘रामायण’ ही पौराणिक मालिका पहिल्यांदा प्रसारित झाली होती, तेव्हा रस्ते ओस पडायचे. यंदा लॉकडाउनच्या काळात दूरदर्शनवरून ती पुन्हा प्रसारित करण्यात आली, तेव्हाही त्या मालिकेने प्रेक्षकसंख्येचा उच्चांक गाठला. आता ही मालिका प्रथमच टीव्हीवर मराठीतून प्रसारित होणार आहे. 

या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. रामायण ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम आणि असामान्य श्रद्धेची ही गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठीही अनोखी पर्वणी असेल. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत घराघरात पोहोचलेली स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी हा नजराणा घेऊन येणार आहे, असे स्टार प्रवाहतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. एक जूनपासूनच ही मालिका प्रसारित करण्याचा स्टार प्रवाहचा मानस होता; मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आली. आता ११ जूनपासून दररोज रात्री नऊ वाजता ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे.

याविषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच ‘स्टार प्रवाह’वर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभू राम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील आणि कसे वाटतील, हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.’

पुढे अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या स्वप्नील जोशीने या रामायण मालिकेत कुशची भूमिका साकारली होती. ती त्याची पहिलीच भूमिका होती. ‘स्टार प्रवाह’वर मराठीतून सुरू होणार असलेल्या रामायणाबद्दल स्वप्नील म्हणाला, ‘रामायण साधारण ३० वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून ते जितके वेळा ज्या ज्या चॅनेलवर दाखवलं गेलं, तेव्हा फक्त मराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेने भुरळ घातली. त्यामुळे रामायण आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, याबद्दल स्टार प्रवाहचं खूप खूप अभिनंदन. मला खूप आनंद आणि अभिमान आहे, की मी या मालिकेचा एक भाग होतो. मी कुश साकारला होता. आता हे सगळं आपल्या मातृभाषेत अनुभवायला मिळणार याचा आनंद वेगळाच आहे. प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच प्रार्थना.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZBNCN
Similar Posts
वहिनी ही लाडाची... ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही नवी मालिका ‘स्टार प्रवाह’वर २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. विभक्त कुटुंबपद्धतीच्या आजच्या युगात एकत्र कुटुंबपद्धतीचं महत्त्व या मालिकेतून दाखवले जाणार आहे. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या मालिकेतील भूमिकेविषयी अभिनेत्री नंदिता पाटकर यांच्याशी साधलेला हा खास संवाद
आयुष्यात मिळालेली दुसरी संधी अत्यंत महत्त्वाची : राहुल देशपांडे ‘स्टार प्रवाह’वर १२ जानेवारीपासून दर शनिवार-रविवारी दुपारी १२ वाजता ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम सुरू होत आहे. राहुल देशपांडे, मृणाल कुलकर्णी, आदर्श शिंदे हे कलाकार या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत असून, अभिनेते पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या निमित्ताने, सुप्रसिद्ध गायक
दीपाली पानसरे करतेय कमबॅक मुंबई : देवयानी या मालिकेतून रसिकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री दीपाली पानसरे तब्बल पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ‘स्टार प्रवाह’वर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘प्रत्येक प्रॉब्लेमला आहे सोल्यूशन’ असं सांगणारी नवी मालिका ‘वैजू नंबर वन’ ऑफिसच्या वेळा, मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद... टेन्शनची कारणं एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात निरागस हास्य आणि निवांत क्षण कुठे तरी हरवत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर, धमाल मनोरंजनाचं औषध घेऊन येतेय ‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘वैजू नंबर वन.’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language