Ad will apear here
Next
पुण्यातील शाळांमध्ये वाजणार वॉटर बेल
प्रातिनिधिक फोटो

पुणे : मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी आता शाळांमध्ये वॉटर बेल वाजणार आहे. शाळेत खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात मुले पाणी प्यायचे विसरतात, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी पाणी शरीरात जाते. यामुळे अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. ते टाळण्यासाठी आता शाळांमध्ये  ठराविक काळानंतर मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी वॉटर बेल वाजविण्यात येणार आहे. 


केरळ राज्यात असा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच  धर्तीवर पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये, तसेच खासगी शाळांमध्येसुद्धा हा उपक्रम राबविण्यात यावा, असा प्रस्ताव नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महिला व बालकल्याण समितीसमोर मांडला होता. त्याला सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली. यानुसार आता सर्व शाळांमध्ये वॉटर बेल वाजविली जाणार आहे. 

‘शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्वांनीच पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. कमी पाणी पिण्याची सवय शालेय विद्यार्थ्यांमध्ये जास्त असल्याने आता या ठरावामुळे ह्या समस्येच्या निराकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. ही खूप समाधानाची बाब आहे,’ अशी भावना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZMGCH
Similar Posts
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.
रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात आरोग्यरक्षा सेवा अभियान; डॉक्टरांना सहभागी होण्याचे आवाहन पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे २७ एप्रिल २०२०पासून पुणे शहरातील वंचित वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आरोग्यरक्षा सेवा अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यात व्यापक तपासणी मोहिमेचा समावेश असून, गरजूंना औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुणे महानगरपालिका,
टाटा मोटर्सतर्फे ५०० गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी टाटा मोटर्सतर्फे यंदा पुण्यातील इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या ५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
देह व अवयवदान जागृती कार्यक्रमाला प्रतिसाद पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटल्सच्या सहकार्याने ‘देह व अवयवदान जागृती’ या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ५० नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language