Ad will apear here
Next
साताऱ्यातील धोंडेवाडी पाझर तलावावर फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन


मायणी (सातारा) : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्ष्यांचे धोंडेवाडी पाझर तलावात आगमन झाले आहे. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील मायणीपासून तीन किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी या पाझर तलावात दाखल झाले आहेत.

लालबुंद चोच, लांबसडक मान, लांब पाय असे त्यांचे लोभस रूप असते. त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. सध्या या पाझर तलावात फ्लेमिंगोंची संख्या कमी असली, तरी येत्या काही दिवसांतच हजारोंच्या संख्येने पक्षी दाखल होतील. फ्लेमिंगोंच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली मनाला मोहून टाकतात. फ्लेमिंगोंबरोबर इतर पक्ष्यांचेही थवेच्या थवे येऊ लागले आहेत. फ्लेमिंगोंच्या आगमनामुळे परिसरातील पक्षीप्रेमींची पावले तलावाच्या दिशेने पडू लागली आहेत.

फ्लेमिंगोंच्या आगमनामुळे दर वर्षी खटाव तालुक्याच्या वैभवात भर पडते. पर्यटक, पक्षीनिरीक्षक व पक्षीप्रेमींना त्यामुळे पर्यटनाची संधी मिळते. सध्या मायणी, येरळवाडी व धोंडेवाडी येथील तलावांत पाणीसाठा उपलब्ध असल्याने हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो दाखल झाले आहेत. 

थंडीची चाहूल सुरू झाली, की नोव्हेंबर-डिसेंबरच्या कालावधीत हे पक्षी तलावावर दाखल होतात; मात्र या वेळी थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे हे परदेशी पक्षी जानेवारीमध्ये आले आहेत. मायणी येथे पक्षी आश्रयस्थान असून, या आश्रयस्थानामध्ये नेहमी फ्लेमिंगोंचे आगमन होत होते. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून या भागात पाऊस न पडल्यामुळे तलावात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे या आश्रयस्थानाकडे फ्लेमिंगोने पाठ फिरवली होती. या वर्षी मायणी तलावात भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे काही दिवसांतच फ्लेमिंगो पक्षी मायणी तलावावर हजेरी लावतील.

गेल्या वर्षी येरळवाडी तलावात पाणीसाठा असल्याने फ्लेमिंगोंनी हजेरी लावली होती. या वर्षी मात्र धोंडेवाडी येथे हजेरी लावली असून, ही पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमींसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. फ्लेमिंगोंबरोबरच नाम्या, सुरुची, नकटा, चक्रवाक, शराटी, नदी सूरय, पाणकोंबड्या, चमचचोच्या, राखी बगळा, पांढऱ्या मानेचा करकोचा, टीबुकली, रंगीत करकोचा, जांभळी पाणकोंबडी, खंड्या, करकोचा, तुतवार, तापस तुतारी आदी पक्षीही येथे मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZUSCI
Similar Posts
कोकणातील डुगवे : खवले मांजरांना देवाचे स्थान देऊन संवर्धन करणारे जगातील पहिले गाव खवले मांजर अर्थात पँगोलिन हा प्राणी दिवसाला सुमारे वीस हजार कीटक खात असल्याने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो; मात्र त्याच्या खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, तसेच चिनी औषधांसाठी प्रचंड मागणी असल्याने या प्राण्यांची शिकार आणि तस्करी होते. कोकणातील चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था
महाबळेश्वर गारठले; वेण्णा तलाव परिसरात धुक्याची चादर महाबळेश्‍वर : गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढत चालला आहे. प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर गरम कपडे, शाली, स्वेटर्स, वूलनचे कपडे घालून फिरताना दिसत आहेत.
श्री खंडोबा-म्हाळसा शाही विवाहाला लाखोंचा जनसागर पाल (ता. कराड, जि. सातारा) : पाल येथे तारळी नदीच्या काठी महाराष्ट्रासह युगानुयुगे भक्तांची आर्त हाक ऐकण्यासाठी उभा असलेला, कष्टकरी व श्रमकरी वर्गाचे दैवत असलेला श्री खंडेराया बुधवारी (आठ जानेवारी २०२०) गोरज मुहूर्तावर मानकरी वर्गाच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार शाही पद्धतीने पिवळ्याधमक झालेल्या पालनगरीमध्ये म्हाळसादेवींशी विवाहबद्ध झाला
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

Is something wrong?
Select Location
OR

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
Share This Link
Select Language