Ad will apear here
Next
मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज
पारंपरिक पदार्थांबरोबरच चुरचुरीत सिझलर्स, पिझ्झा, पास्ता एवढेच नव्हे, तर वॉफल्स, पुडिंग्स, मफिन्स घरच्या घरी बनवता आले तर किती बहार येईल. कांचन बापट यांनी या पुस्तकात हे पदार्थ घरच्या घरी करण्यासाठी पाककृती दिल्या आहेत.

फुल मील विभागात सूप, स्टार्टर, पनीर स्टार्टर, रोटी-पराठा, भाताचे प्रकार रायता-कोशिंबिरी यांचा समावेश आहे. शॉर्ट मील विभागात पावाबरोबर खाण्याचे पदार्थ, सिझलर्स, चाट, सँडविच, पिझ्झा, पास्ता, रॅप्स अँड रोल्स आदींच्या पाककृतींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या सर्व पदार्थांना रेस्टॉरंटची चव यावी यासाठी टिप्स दिल्या आहेत. मुलांचे वाढदिवस अथवा गेट-टूगेदरनाही हे पदार्थ बनवता येऊ शकतात पौष्टिक आणि रुचकर असे या पदार्थांचे स्वरूप आहे

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १६६
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZNKBQ
Similar Posts
मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज वेगवेगळे खाण्याची हौस केवळ मोठ्यांना असते, तशी मुलांनाही असते. मुलांच्या वाढत्या वयात त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला देताना त्यातून त्यांना उरेल अशी ऊर्जा मिळेल आणि एकूणच आरोग्यासाठी ते पोषक असेल, याकडे लक्ष द्यायला हवे. कांचन बापट यांनी या पुस्तकात मुलांना आवडतील अशा पौष्टिक पदार्थांच्या पाककृती सांगितल्या आहेत
१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज् + १०१ बेबी फूड रेसिपीज् रोज उठून ब्रेकफास्टला काय करायचे, हा कोणत्याही घरात पडणारा प्रश्न. कांचन बापट यांनी मात्र, आपली या प्रश्नातून सोडवणूक केली आहे. वर्षभर पुरतील अशा ब्रेकफास्टच्या पाककृती त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत.
सांस्कृतिक भारत- भारतीय राज्यांची संक्षिप्त ओळख भारताची संस्कृती काही पानांत सामावणे अवघडच. या संस्कृतीची तोंडओळख करून देण्याचे काम सांस्कृतिक भारत हे डॉ. सुधीर देवरे यांचे पुस्तक करते. यात देशातील सर्व राज्ये, तेथील भाषा, लोकसंख्या, विभाग आदींची माहिती आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्ये, तेथील जाती-जमाती आणि प्रमुख बोलीभाषा यांची सविस्तर माहिती पुस्तकात मिळते
विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य शेफ विष्णू मनोहर हे आता मराठी कुटुंबात सर्वांनीच परिचित आहेत. विविध पाककृतींवरील त्यांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत. यातील पाच पुस्तकांचा संच ‘विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य’मधून वाचकांच्या भेटीस आला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language