करोनाच्या संसर्गामुळे सध्या बहुतांश ठिकाणी लॉकडाउन सुरू आहे; मात्र हा संसर्ग तातडीने आटोक्यात येण्याची शक्यता नसल्याने लॉकडाउन हा त्यावरचा उपाय नाही. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर करोनाचा संसर्ग न होण्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन सर्व व्यवहार सुरू करणे गरजेचे ठरणार आहे. म्हणूनच प्रत्येक व्यवसाय या परिस्थितीत नव्याने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात आहेत. ‘लोरिएल इंडिया’ या कंपनीने आपल्या नेटवर्कमधील सलून्स (केशकर्तनालये) आणि हेअर ड्रेसर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यात आवश्यकतेनुसार सुधारणाही केल्या जाणार आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे या कंपनीने आपल्या नेटवर्कसाठी जाहीर केली असली, तरी सर्वच केशकर्तनालयांना आपापली मार्गदर्शक तत्त्वे तयार करताना त्यांचा उपयोग होणार आहे.
‘लोरिएल इंडिया’ने दिलेले अधिकृत प्रसिद्धीपत्रक सोबत देत आहोत.
‘लोरिएल इंडिया’ने भारतातील सलोन्समध्ये स्वच्छता आणि कामकाजाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. व्यवसाय पुन्हा सुरू करताना या मार्गदर्शक तत्त्वांचा वापर होऊ शकतो. लोरिएलतर्फे हेअरड्रेसर्सना सलोनमधील नेहमीच्या सुरक्षा आणि स्वच्छता उपायांपेक्षा अधिक काळजी घेऊन त्यांना स्वत:ला आणि क्लाएंटला सुरक्षित ठेवण्यासाठी साह्य केले जाणार आहे. यात मास्क आणि हँड सॅनिटायझर पुरवण्यासोबतच कामकाजाची नवी मार्गदर्शक तत्त्वेही पुरवली जातील. ११० वर्षांहून अधिक काळ सौंदर्याचा वारसा जपणारी लोरिएल ही कंपनी या क्षेत्राची सेवा करण्यास आणि चालना देण्यास एक भागीदार म्हणून बांधील आहे.
लोरिएलचे ४५ हजार सलोनचे नेटवर्क आणि एक लाख ७० हजार हेअर ड्रेसर्समध्ये लॉकडाउन संपण्याआधी या ‘बॅक टू बिझनेस’ (पुन्हा काम सुरू करताना) स्वच्छता आणि सुरक्षा तत्त्वांचे मार्गदर्शन केले जाईल. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि हित यांची खातरजमा, अधिक सुरक्षित कामकाज पद्धती लॉकडाउननंतर कशा अवलंबल्या जाव्यात याबद्दल हे मार्गदर्शन असेल. यात हात स्वच्छ ठेवणे, साधनांचे निर्जंतुकीकरण, सलोन रुटिंग, प्री-बुकिंग, अपॉइंटमेंट्समध्ये काही कालावधी ठेवता यावा यासाठी सलोनचे पुनर्व्यवस्थापन, इलेक्ट्रॉनिक पेमेंट अशा विविध माध्यमांतून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात असल्याची खातरजमा होईल. लोरिएल प्रोफेशनल्स, मॅट्रिक्स, केरास्टाझ आणि शेरील्स कॉस्मेसुटिकल्स या लोरिएल प्रोफेशनल प्रोडक्ट ब्रँडच्या सर्व सलोन पार्टनर्स आणि हेअरड्रेसर्सना ही मार्गदर्शक तत्त्वे आता उपलब्ध करण्यात आली आहेत.
सध्या काही काळासाठी व्यवसाय बंद असला, तरी हेअरड्रेसर्सना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन त्यांची कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी लोरिएल प्रोफेशनल प्रोडक्ट डिव्हिजनतर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हेअरड्रेसर्सना नवे प्रशिक्षण मिळेल आणि क्लायंटशी त्यांचा संपर्कही अबाधित राहील. या काळात ५० हजार हेअरड्रेसर्स आणि ब्युटिशिएन्ससाठी ४२५०हून अधिक ई-ट्रेनिंग सत्रे घेण्यात आली. लॉकडाउनच्या या काळात लोरिएलने त्यांचे वितरक आणि थेट सलोन भागीदारांसाठी वसुलीचा काळही वाढवून दिला आहे.
लोरिएल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित जैन म्हणाले, ‘हेअरड्रेसिंग इंडस्ट्री हा रोजगाराचा एक मुख्य स्रोत आहे आणि लॉकडाउन संपल्यानंतर हा व्यवसाय सुरक्षितपणे पुन्हा सुरू होणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही महिन्यांत आमच्या हेअरड्रेसर्सचे महत्त्व आम्हाला फारच तीव्रतेने जाणवले आहे आणि हेअर सलोन सुरू व्हावेत, अशी मागणी ग्राहकांकडूनही मोठ्या प्रमाणात होत आहे.’
प्रोफेशनल प्रोडक्ट्स डिव्हिजनचे संचालक डी. पी. शर्मा म्हणाले, ‘भारतात लोरिएल प्रोफेशनल प्रोडक्ट डिव्हिजनमध्ये ४५ हजारांहून अधिक सलोनमध्ये काम करणारे एक लाख ७० हजारांहून अधिक हेअर ड्रेसर पार्टनर आहेत. या संकटकाळात आमच्या सलोन भागीदारांना साह्य करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. यात आमचे ग्राहक, आमचे भागीदार सलोन आणि त्यांचे कर्मचारी यांची सुरक्षा हा आमच्यासाठी मुख्य उद्देश असणार आहे. भागीदार आणि हेअर ड्रेसर क्षेत्राचे पुरस्कर्ते म्हणून असलेली आमची भूमिका याबद्दल आम्ही आता आधीपेक्षा अधिक बांधील आहोत आणि या क्षेत्रावर या संकटाचा कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी आम्ही सातत्याने आणि अथक प्रयत्न करत आहोत.’
‘रेडक्वांटा’ने केलेल्या अहवालानुसार, सध्याच्या काळात सलोनमध्ये जाणे हे लोकांना अत्यंत गरजेचे वाटत असलेल्या पहिल्या तीन कामांमध्ये आहे. ५६ टक्के लोकांनी सलोनमध्ये जाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
गेल्या काही वर्षात लोरिएलने भारतीय हेअरड्रेसिंग क्षेत्रात मोठा सहभाग नोंदवला आहे. प्रशिक्षण आणि शिक्षण हा या क्षेत्राचा मूळ पाया आहे आणि लोरिएलने या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कायमच गुंतवणूक करत उच्च प्रतीची उत्पादने, ग्राहकांचा अनुभव उत्तम बनवत आणि हेअरड्रेसर्सना आपले कौशल्य दाखवण्यासाठी हेअरड्रेसिंग अॅवॉर्डसारखे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन सलोन क्षेत्राला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. मागील १० वर्षांत लोरिएलने लोरिएल प्रोफेशनल, मॅट्रिक्स, केरास्टाझ आणि शेरील्स कॉस्मेसुटिकल्स या ब्रँड्सच्या माध्यमातून ४५ हजार सलोनसोबत भागीदारी केली आहे आणि दहा लाखांहून अधिक हेअरड्रेसर्सना प्रशिक्षण दिलं आहे.
(To read this press release in English, please click here.)