Ad will apear here
Next
‘संगीत आणि नृत्याविष्कारामुळे जीवन सुसह्य होते’
सुचेता भिडे-चापेकर असे मत
समूहनृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते रेडक्रॉस कर्णबधिर विद्यालयाचे विद्यार्थी

पुणे : ‘पृथ्वीवर केवळ मानवप्राणी हा एकमेव आहे, ज्याला ईश्वराकडून कलेची देणगी मिळालेली आहे. संगीत आणि नृत्याविष्कारामुळे आपले जीवन सुसह्य झाले आहे,’ असे मत ज्येष्ठ नृत्यगुरू आणि भरतनाट्यम नृत्य कलाकार सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले. लायन्स क्लबतर्फे आयोजित कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठीच्या समूहनृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. 

‘कर्णबधिर मुलं जेव्हा ही कला अंगी जोपासतात तेव्हा खरच त्यांचं कौतुक वाटते, त्यांच्या शिक्षकांचेही कौतुक आहे,’ अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.  

सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना गाता यावे, नाचता यावे, या उद्देशाने दर वर्षी लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टच्या वतीने कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा निवारा वृद्धाश्रम येथील सभागृहात या स्पर्धा पार पडल्या.  

या स्पर्धेमध्ये अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, वायएमसीए कर्णबधिर विद्यालय, सी. आर. रंगनाथन, आधार मुकबधिर केंद्र, रूईया मुकबधिर विद्यालय, रेडक्रॉस कर्णबधिर विद्यालय, धायरी कर्णबधिर विद्यालय, शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्र आदी संस्थांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

समूहनृत्य स्पर्धेत रेडक्रॉसच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक वायएमसीए विद्यालयाने,  तृतीय क्रमांक सी. आर. रंगनाथन विद्यालयाने आणि चतुर्थ क्रमांक रुईया मुकबधिर विद्यालयाने पटकावला. शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्राला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

या वेळी स्पर्धा प्रमुख सीमा दाबके, मालती भामरे, प्रिती परांजपे, बिपीन पाटोळे, भाग्यश्री चोंदे, रेश्मा माळवदे उपस्थित होते. सूत्रसंचालन पल्लवी देशमुख यांनी केले, तर मृदुला केळकर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZNBCH
Similar Posts
‘सिम्बायोसिस’ने पटकावले ‘एन्थुजिया’चे विजेतेपद पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले.
विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी ‘जीजीपीएस’मध्ये प्रदर्शनाचे आयोजन रत्नागिरी : रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेत (जीजीपीएस) २८ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२० या कालावधीत विद्यार्थ्यांनी कार्यानुभवातून बनविलेल्या वस्तू आणि चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत कार्याध्यक्ष अरुअप्पा जोशी यांच्या
गोळाफेक स्पर्धेत ‘सूर्यदत्ता’च्या सावरी शिंदेला रौप्यपदक पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींसाठीच्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या सावरी शिंदे हिने रौप्यपदक जिंकले. आता ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. १३.१२ मीटरचा पल्ला गाठून तिने हे यश संपादन केले
टाटा मोटर्सतर्फे ५०० गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी टाटा मोटर्सतर्फे यंदा पुण्यातील इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या ५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language