Ad will apear here
Next
'सूर्यदत्ता'च्या युवराज दळवीचे लॉन टेनिस स्पर्धेत यश
राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड
युवराज दळवी याचे अभिनंदन करताना प्रा. डॉ. संजय चोरडिया व इतर मान्यवर.

पुणे : सोलापूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या १७ वर्षाखालील विभागीय लॉन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सूर्यदत्ता ज्युनियर कॉलेजच्या युवराज दळवी याने यश प्राप्त केले. विभागीय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी युवराज दळवी याला मिळणार आहे. 

त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, फिटनेस अँड स्पोर्ट डायरेक्टर निशिगंधा पाटील यांनी अभिनंदन केले.

या वेळी बोलताना सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘विविध क्रीड़ा स्पर्धांमध्ये सूर्यदत्ता संस्थेतील विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. खेळामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. सामाजिक भान, सांघिक भावना, नेतृत्व, सहनशीलता आदी गोष्टी मुलांना त्यातून आत्मसात करता येतात. शिस्तीच्या सवयींबरोबरच त्यांना अपयशातून यश मिळवण्याचा विश्वास मिळतो. त्यामुळे ‘सूर्यदत्ता’मध्ये खेळांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. फिजिकल डायरेक्टरची एक टीम विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण विकसित करण्यासाठी मेहनत घेत आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZRPCF
Similar Posts
‘सूर्यदत्ता’च्या श्रावणी, अनुश्रीला जिम्नॅस्टिक्समध्ये विजेतेपद पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा संकुलाच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये आयोजित केलेल्या १७ वर्षांखालील जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सूर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजच्या श्रावणी पेंडसे हिने प्रथम, तर अनुश्री कुलकर्णी हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय यश पुणे : ‘सूर्यदत्ता’च्या यश बारगुजे, जितेंद्र चौधरी आणि वैष्णवी मोरे या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून, ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सूर्यदत्ता अॅनिमेशन इन्स्टिट्यूट देशातील पहिल्या तीन संस्थांमध्ये पुणे : देशातील पहिल्या तीन क्रमांकाच्या अॅनिमेशन प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सूर्यदत्ता’च्या अॅनिमेशन इन्स्टिट्यूटने स्थान मिळवले आहे. ‘टॉप अॅनिमेशन एज्युकेशन ब्रँड्स २०१९’मध्ये व्हिसलिंग वूड्स, पिकासो, एनआयडी यासारख्या नामवंत संस्थांबरोबर ‘सूर्यदत्ता’च्या अॅनिमेशन इन्स्टिट्यूटचा सन्मान करण्यात आला. यामुळे
‘सूर्यदत्ता’तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पुणे : ‘आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language