Ad will apear here
Next
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक
महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; सर्वाधिक ठाण्यात


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वांत मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकूण १४ लाख ४० हजार मतदार आहेत. यामध्ये सात लाख ३५ हजार ५९७ एवढ्या महिला मतदार आहेत. ठाणे मतदारसंघात राज्यात सर्वाधिक सुमारे २३ लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून, १२ लाख ६० हजारांहून अधिक पुरुष मतदार आहेत.

राज्यात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार टप्प्यांत होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. राज्यात चार कोटी ५७ लाखांहून अधिक पुरुष मतदार, असून चार कोटी १६ लाखांहून अधिक महिला मतदार आहेत.

नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून, अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. मावळ मतदारसंघात सुमारे २२ लाखांहून अधिक, शिरूर २१ लाखांहून अधिक, नागपूर २१ लाखांहून अधिक, पुणे आणि बारामती मध्ये प्रत्येकी २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

मुंबईतील मुंबई-उत्तर मतदारसंघात १६ लाखांहून अधिक मतदार असून, मुंबई-उत्तर दक्षिण मतदारसंघात १६ लाख ९८ हजार मतदार आहेत, तर मुंबई-उत्तर पूर्व मतदारसंघात १५ लाख ५८ हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात १६ लाख ४८ हजार आणि मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात १४ लाख १५ हजार एवढे मतदार आहेत.

मतदारसंघनिहाय एकूण मतदारांची संख्या (सुमारे) : नंदूरबार- १८ लाख ५० हजार, धुळे- १८ लाख ७४ हजार, जळगाव- १९ लाख १० हजार, रावेर- १७ लाख ६० हजार, बुलढाणा- १७ लाख ४६ हजार, अकोला- १८ लाख ५४ हजार, अमरावती- १८ लाख १२ हजार, वर्धा- १७ लाख २३ हजार, रामटेक- १८ लाख ९७ हजार, भंडारा-गोंदिया- १७ लाख ९१ हजार, गडचिरोली-चिमूर- १५ लाख ६५ हजार, चंद्रपूर- १८ लाख ९० हजार, यवतमाळ-वाशिम- १८ लाख ९० हजार, हिंगोली- १७ लाख १६ हजार, नांदेड- १७ लाख, परभणी- १९ लाख ७० हजार, जालना- १८ लाख ४३ हजार, औरंगाबाद- १८ लाख ५७ हजार, दिंडोरी- १७ लाख, नाशिक- १८ लाख ५१ हजार, पालघर- १८ लाख १३ हजार, भिवंडी- १८ लाख ५८ हजार, कल्याण- १९ लाख २७ हजार, रायगड- १६ लाख ३७ हजार, अहमदनगर- १८ लाख ३१ हजार, शिर्डी- १५ लाख ६१ हजार, बीड- २० लाख २८ हजार, उस्मानाबाद- १८ लाख ७१ हजार, लातूर- १८ लाख ६० हजार, सोलापूर- १८ लाख २० हजार, माढा- १८ लाख ८६ हजार, सांगली- १७ लाख ९२ हजार, सातारा- १८ लाख २३ हजार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- १४ लाख ४० हजार, कोल्हापूर- १८ लाख ६८ हजार आणि हातकणंगले- १७ लाख ६५ हजार.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZOBBY
Similar Posts
‘कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या’ मुंबई : ‘सन २०१०ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया होऊन ७० टक्के स्थानिकांना सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय करून कोकणातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा,’ अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे २६ जून रोजी विधानसभेत केली.
‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेत दुरुस्ती’ मुंबई : ‘रत्नागिरी, सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेमध्ये २०१५पूर्वी बांधकाम परवानगी देण्यासाठी जे नियम व अटी प्रचलित होते तेच पुन्हा लागू करण्यासाठी अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करा,’ अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.
‘कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे’ मुंबई : ‘स्वतंत्र विद्यापीठासाठी कोकणातील सर्व महाविद्यालये सकारात्मक असून, शिक्षणप्रेमींकडूनही स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे. त्यामुळे सोलापूर, नांदेड, गडचिरोली, जळगावच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने
चक्रीवादळ मुंबईजवळ धडकण्याची शक्यता; अतिदक्षतेचा इशारा मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language