Ad will apear here
Next
सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती
भटकंती म्हणजे केवळ मौजमजा नव्हे; तर भटकंती म्हणजे नवनवीन ठिकाणे पाहाणे, संबंधित परिसराची माहिती मिळवणे, तेथील भौगोलिक-सामाजिक ज्ञान वाढवणे, इतिहास जाणून घेणे. ओंकार वर्तले यांच्या या पुस्तकाने नेमके हेच साध्य केले आहे. सह्याद्रीतील कडेकपारी हे भटक्यांचे लाडके ठिकाण. सह्याद्रीतील अपरिचित ठिकाणांची सफर वर्तले यांनी या पुस्तकातून घडविली आहे.

हा लेखन प्रवास पद्यावती लेणींपासून सुरू होतो. कोथळेगड, कलागड, कर्णेश्वर, सोनगीर किल्ला, कन्हेरगड असे किल्ले या प्रवासात सोबतीला येतात. घोरवडेश्वर, कांब्रे लेणी, कोंडणा लेणी, दुर्गेश्वर लेणी असे लेणीसौंदर्य भेटते. अंबरनाथचे प्राचीन शिवालय, झोड्गेचे शिवालय अशी ठिकाणेही समजतात.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १७६
किंमत : १७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZQVBK
Similar Posts
आडवाटेवरची भटकंती शहरातील सिमेंटच्या जगलांना कंटाळलेल्यांना कायम हिरवा निसर्ग, निसर्गाच्या कुशीत दडलेले सौंदर्य, गडकिल्ले, मंदिरे, लेण्या आणि बरेच काही साद घालत असते. निसर्गाच्या प्रेमातून आणि अनवट वाट धुंडाळण्याच्या उर्मीतून खऱ्या अर्थाने ‘भटक्या’ असणाऱ्या ओंकार वर्तले यांना नवनवीन ठिकाणे साद घालत गेली. त्यातून त्याची
मंदिरांच्या देशा पर्यटनासाठी भारतात कोठेही गेला, तरी एक तर त्यात मंदिरांची भेट असतेच. त्यातच महाराष्ट्राचे वर्णन ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे करतानाच ‘मंदिरांच्या देशा’ असेही केले पाहिजे, अशी अपेक्षा ओंकार वर्तले यांनी व्यक्त करीत महाराष्ट्रातील मंदिरांचा परिचय ‘मंदिरांच्या देशा’मधून केले आहे.
सफर मावळची ‘सफर मावळ’ची या पुस्तकाचा अल्प परिचय...
मॅन इटर्स अॅंड मेमरीज आजच्या काळात शिकारीला बंदी असली, तरी एक काळ असा होता, की त्या काळात मोठमोठ्या शिकारी करणे अभिमानास्पद मानले जात होते. त्या सुरस, रोमांचकारी कहाण्या रंगवून सांगितल्या जात. जे. ई. कॅरिंग्टन टर्नर यांनी अशाच काही सुरस शिकारकथा या पुस्तकात सांगितल्या आहेत. लालू दुर्वे यांनी त्यांचा अनुवाद केला आहे. टर्नर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language