Ad will apear here
Next
नागरी समस्या सोडवण्यास प्राधान्यक्रम द्या
प्रभाग क्रमांक सातमध्ये पाहणी करताना महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे : ‘झोपडपट्टी विभागतील नागरी समस्या प्राधान्यक्रमाने सोडवा,’ असे आदेश ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी प्रशासनास दिले. प्रभाग क्र. सातचा पाहणी दौरा करत असताना त्यांनी हे निर्देश दिले. 

प्रभाग क्रमांक सातमधील कामांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्थानिक नगरसेवकांनी महापौरांना नागरिकांच्या वतीने निवेदन दिले होते, त्यानुसार प्रभागाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यास शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, राधिका फाटक, तर प्रशासनाच्या वतीने सहाय्यक आयुक्त चारुशिला पंडित, कार्यालयीन अधिक्षक प्रकाश इषी, कार्यकारी अभियंता रामकृष्ण कोल्हे, विलास धुमाळ, स्वच्छता निरीक्षक सौंदाने, कनिष्ठ अभियंता हर्डीकर, किरण भोये, लोकरे, कर्मचारी चोरगे व प्रभागातील कार्यकर्ते विलास मोरे, राजु फाटक, विजय दिवाटे, संतोष मोरे, प्रताप सुर्वे, स्वप्निल शिंदे, शिरीष मंडलिक, अमोल कदम, चेतन पालांडे व विभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यामध्ये मिनाक्षी शिंदे यांनी स्थानिक नगरसेवक, महापालिकेचे संबंधित अधिकारी व स्थानिक नागरिकांसमवेत लक्ष्मी-चिरागनगर भागांतील संपूर्ण परिसराचा दौरा करुन, येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा करुन आवश्यक कामे तातडीने करण्याबाबत प्रशासनास आदेश दिले. यामध्ये चिरागनगर येथील चौकातील आवश्यक कामे करणे, विभागात ठिकठिकाणी पडलेले रॅबिट उचलणे, सार्वजनिक शौचालयांची आवश्यक दुरुस्ती करणे किंवा नव्याने बांधणे, गटाराची दुरुस्ती करणे, चेंबर्स दुरुस्त करणे वा नवीन बसविणे, गटारातून गेलेल्या विद्युत केबल स्थलांतर करणे, आवश्यकतेनुसार शास्त्रोक्त पध्दतीने गतिरोधक टाकणे, रस्त्याचे डांबरीकरण करणे, कल्व्हर्टची कामे करणे, व्होल्टास कंपनीच्या मागील मलबा हटविणे, जलवाहिनी टाकणे, विभागात दिवे/हायमास्ट बसविणे, सांडपाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार गटाराचे बांधकाम करणे, एमएसईबीचे ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करणे आदि कामे करण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी लक्ष्मी-चिरागनगर येथील आरोग्य केंद्रास भेट देवून येथील कामाचा आढावा देखील यावेळी शिंदे यांनी घेतला व रुग्णांना आवश्यक सेवा-सुविधा आणि औषधोपचार करण्याबाबत सूचना केल्या. याबद्दल समस्त नागरिक, स्थानिक नगरसेवकांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

‘नागरिकांच्या समस्या सोडवणे किंबहुना नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे, ते आपण पूर्ण करणारच परंतु उपलब्ध झालेल्या सेवा-सुविधा व महापालिकेच्या उपक्रमांना नागरिकांनीदेखील सहकार्य केले पाहिजे,’ असे आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी यावेळी केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WYZEBE
Similar Posts
शैरील चार्ल्सचे अभिनंदन ठाणे : ‘वर्ल्ड नेक्स्ट टॉप मॉडल २०१७’ व ‘मिस टिआरा इंडिया २०१७’ विजेती शैरील चार्ल्स यांचे महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक योगेश जानकर, माजी नगरसेवक हिरा पाटील, उपायुक्त अशोक बुरपल्ले आदी मान्यवर उपस्थित होते
पोलिस स्टेशनचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कावेसर व पारसिक या दोन्ही सुविधा भूखंडांवर नव्याने बांधण्यात आलेल्या कासारवडवली आणि कळवा पोलिस स्टेशनचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा ठाणे : स्तनपानाचे महत्त्व सांगणारे पोस्टर्स, घोषवाक्य स्पर्धा, कार्यशाळा आणि चर्चासत्र आणि स्तनपानाचे महत्त्व सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. स्तनपान सप्ताह सांगता कार्यक्रमासाठी
महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language