Ad will apear here
Next
सायबर क्राइम अवेअरनेस उपक्रमाचे कौतुक

सोलापूर : येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सायबर क्राइम अवेअरनेस कार्यक्रमाचे सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस आयुक्तांतर्फे भरभरून कौतुक करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान ७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राइम रोखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

मागील वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन 'सायबर क्राइम' अवेअरनेस चे व्याख्यान दिले गेले. यात सायबर क्राइम म्हणजे काय? सायबर क्राइमचे प्रकार, मोबाइल, कॉम्प्युटर इंटरनेट वापरकर्त्यांनी घ्यावयाची काळजी याबद्दल व्याख्यानाद्वारे जनजागृती केली. या कार्यक्रमांतर्गत विविध महाविद्यालयातून सुमारे सात हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.

सोलापूर पोलीस आयुक्तालय व सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवला गेला. यासाठी सिंहगड महाविद्यालयाचे प्रा. रितेश दायमा व सारंग तारे यांनी व्याख्यानाद्वारे जनजागृती केली. या कार्यक्रमाचे तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर व पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सिंहगडच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. या टीममध्ये  प्रा. व्ही. एस. बिरादार, प्रा. हरीश गुरमे, प्रा. ए. डी. शिंदे, सुहास माने, प्रा. एस. एच. लामकाने, प्रा. विनय जोकारे यांनी परिश्रम घेतले.    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZXTBE
Similar Posts
पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ञांचे मार्गदर्शन सोलापूर : ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथील ड्रीम फाउंडेशनचे व्यवस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,
काशिनाथ भतगुणकी यांना वसुंधरा मित्र पुरस्कार सोलापूर : वृक्षारोपणाच्या चळवळीतील कार्यकर्ते काशिनाथ भतगुणकी यांना नुकताच वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.  किर्लोस्कर समूहातर्फे सोलापुरात नुकताच वसुंधरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या महोत्सवात दुसऱ्या दिवशी भतगुणकी यांचा गौरव करण्यात आला
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय
पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश बीड : बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल नुकत्याच झालेल्या पावसामुळे खचला होता. यामुळे या महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी पुलाच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language