Ad will apear here
Next
मनोविकास प्रकाशनच्या वतीने ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : आयकर विभागाच्या धाडी आणि त्याच्याशी निगडीत किस्से आपण सर्वांनीच ऐकले आहेत आणि हे किस्से कायमच कुतूहलाचा विषय बनलेले आहेत. याविषयी आयकर विभागातील एक वरिष्ठ अधिकारी संग्राम गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या कादंबरीचे प्रकाशन मनोविकास प्रकाशनच्या वतीने करण्यात येणार आहे. 

‘येत्या शनिवारी, १९ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. साहित्यिक व समीक्षक नितीन रिंढे आणि रंगकर्मी अतुल पेठे हे देखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने कादंबरीतील निवडक भागाचे अभिवाचन देखील अतुल पेठे करणार आहेत,’ अशी माहिती मनोविकास प्रकाशनचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर यांनी दिली.  हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZQTBW
Similar Posts
‘आदिवासी कथा हे पुनर्कथनाचा अवकाश देणारे अभिजात साहित्य’ पुणे : ‘आदिवासींच्या कथा हे वेगळा अवकाश देणारे अभिजात साहित्य असून, त्या आपल्या जीवनात उर्जामय जादू निर्माण करतात;तसेच त्यांच्यामध्ये पुनर्कथन करण्याचा अवकाश आहे’, असे मत नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी व्यक्त केले.
केरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेमध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांचे ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
‘माणसे हाच सकारात्मक ऊर्जेचा स्रोत’ आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारांची ऊर्जा खूप गरजेची असते. म्हणूनच ‘बी पॉझिटिव्ह’ हे ब्रीदवाक्य घेऊन BytesofIndia.com हे पोर्टल सुरू करण्यात आले. जी माणसे यशस्वी झालेली असतात, ज्यांनी मोठे, वेगळे आणि चांगले काम करून दाखवलेले असते, त्यांच्यामध्ये सकारात्मकता हा समान धागा असतो. या
मनोविकास प्रकाशनतर्फे २९ जूनला चर्चासत्राचे आयोजन पुणे : ‘अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या पुस्तकानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शनिवार, २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता टिळक रस्त्यावरील पद्मजी सभागृहात होईल,’ अशी माहिती ‘मनोविकास’चे संस्थापक अरविंद पाटकर यांनी दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language